मुंबई – मंत्र्याचं घर म्हटलं नोकर-चाकरांचा राबता असतो. मालकीणबाईंनी फक्त ऑर्डर सोडायची पुढच्या काही क्षणात ती गोष्ट त्यांना मिळते. परंतु तनपुरे कुटुंब अगदीच याला अपवाद आहेत. सोनाली तनपुरे यांनी कामवाल्या बाईंच्या घरी जाऊन चुलीवर स्वयंपाक केला.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी आपण मंत्र्याची बायको आहोत हे विसरुन त्यांच्या घरच्या कामवाल्या बाईंच्या घरी जाऊन चुलीवर स्वयंपाक केला. त्यांच्या या साधेपणाची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.
सोनाली तनपुरे यांनी ट्विटरवर एक ट्विट केलं आहे. या ट्विटमधून आमच्या घरी काम करणाऱ्या संगीता वेताळ यांच्या घरी जाऊन आज चुलीवर जेवण बनवण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच अचानकपणे हे दृश्य पाहणाऱ्या मंत्री प्राजक्त यांनाही धक्का बसल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सोनाली तनपुरे यांनी कामवाल्या बाईंच्या घरी जाऊन चुलीवर स्वयंपाक केला. आपल्या घरात काम करते म्हणून काय झालं, शेवटी त्यांच्याही कामाला मोल आहेच की… आणि त्यांनाही आपल्या समान वागवलं पाहिजे, अशी त्यापाठीमागची भावना…!
आमच्या घरी काम करणाऱ्या संगीता वेताळ यांच्या घरी जाऊन आज चुलीवर जेवण बनवण्याचा प्रयत्न केला. अचानक हे दृश्य पाहणाऱ्या @prajaktdada तनपुरे यांच्यासाठी हा सुखद धक्का होता😊 pic.twitter.com/RcVUFunXac
— Sonali Tanpure (@TanpureSonali) January 29, 2021