मुंबई : युक्रेन आणि रशिया यांच्यात जोरदार युद्ध सुरू आहे. यादरम्यान बंदूकीचा धाक दाखवून अफगाणिस्तानवर कब्जा केलेल्या तालिबानने एक आव्हान केले आहे. त्यांनी दोन्ही देशांना शांततेच्या मार्गाने पर्याय काढण्याचे सुचवले आहे. याचाच संदर्भ देत शिवसेनेने भाजपवर खोचक शब्दात निशाणा साधला आहे.
कोल्हापूर महापालिका निवडणूक भाजप धनंजय महाडिकांच्या नेतृत्वात लढणार; कोअर कमिटी बैठकीत निर्णय
शिवसेनेचे नेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर काल आयकर विभागाने छापा टाकला. तर दुसरीकडे किरीट सोमय्या डर्टी डझन नेत्यांची नावे घेऊन दिल्लीत गेले. त्याठिकाणी ही नावं तपास यंत्रणांना देणार असल्यासं त्यांनी म्हटलंय. यावरून शिवसेनेने सामनातून भाजपवर हल्ला बोल केला आहे. शिवसेनेने भाजपची तुलना तालिबान्यांशी केली आहे. भाजपाने भ्रष्टाचाराविरोधात बोलणं म्हणजे तालिबानने रशियाला शांततेसाठी आवाहन करण्यासारखं असल्याचा टोला शिवसेनेनं लगावला आहे.
गली गली मैं शौर है भाजप वाले महाचोर है; रूपाली पाटलांचा भाजपवर 2500 कोटींचा आरोप
भाजपने म्हणे भ्रष्टाचाराविरुद्ध युद्ध पुकारले आहे. रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू आहे हे सगळ्यांना माहीत आहे, पण भाजपानेही युद्ध पुकारले आहे. तेही भ्रष्टाचाराविरुद्ध! केंद्रीय तपास यंत्रणांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर सूडबुद्धीने केलेल्या कारवाईस हे लोक युद्ध वगैरे म्हणत असतील तर ते मूर्खपणाचे लक्षण आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या ‘आड’ लपून हे लोक युद्धाचा आव आणीत आहेत. हा शिखंडी प्रयोग आहे. असं सामना मध्ये लिहिलं आहे.
Read also:
- संजय राठोड यांचा तात्काळ राजीनामा घेतला, राष्ट्रवादी नेत्याचा का नाही? चंद्रकांत पाटलांचा सवाल
- सरकारने शब्द पाळला नाही, त्यामुळेच उपोषण..; संभाजी राजेंनी व्यक्त केली खंत
- आमचा झेंडा भगवा असला तरी…; अब्दुल सत्तारांचा इम्तियाज जलील यांना टोला
- …जोपर्यंत 145 ची मॅजिक फिगर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी तोपर्यंत..; अजित पवारांचा भाजपला टोला
- राष्ट्रवादीचा हरामखोर जिल्हाध्यक्षाची जीभ छाटा? चित्रा वाघ यांनी अशोक गावडेविरोधात खोचला पदर