पुणे : राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे वडील विठोबा रामा भरणे यांचे काल रात्री दीर्घआजाराने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. वडिलांच्या निधनाची माहिती स्वतः दत्तात्रय भरणे यांनी ट्विट करत दिली.
विठोबा भरणे यांच्यावर पुण्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अखेर मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे चार मुले, तीन मुली असा परिवार आहे.
लहानपणापासून आजपर्यंत प्रत्येक यश-अपयशात माझ्या पाठीशी असलेला तात्यांचा आधार अचानक हरपल्याने मन विषण्ण झाले आहे. पितृछत्र हरपल्याने माझ्या जीवनात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे.
— Dattatray Bharane (@bharanemamaNCP) December 29, 2020
विठोबा भरणे यांच्यावर आज (30 डिसेंबर) सकाळी 11 वाजता मूळगावी भरणेवाडी ता.इंदापूर जि. पुणे येथे अंत्यविधी होणार आहे.
लहानपणापासून आजपर्यंत प्रत्येक यश-अपयशात माझ्या पाठीशी असलेला तात्यांचा आधार अचानक हरपल्याने मन विषण्ण झाले आहे. पितृछत्र हरपल्याने माझ्या जीवनात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे, अशी भावना वडिलांच्या जाण्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.