पुणे महानगर पालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पीएमआरडीएचे विक्रम कुमार यांची आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. विक्रम कुमार हे 2004 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
पुण्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याने शेखर गायकवाड यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. पुणे विभागीय आयुक्त म्हणून सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शेखर गायकवाड यांची आता साखर आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. अवघ्या सहा महिन्यांमध्ये शेखर गायकवाड यांची पुणे महापालिकेच्या आयुक्त पदावरुन बदली करण्यात आली आहे. पुणे महापालिकेत येण्यापूर्वी ते साखर आयुक्त म्हणूनच काम पाहत होते. एकूण 5 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत