पालकमंत्री अदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पालकमंत्री कक्ष उभारण्याचे आदेश दिले होते. मात्र, या निर्णयावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेला आता सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे
“आमच्या जिल्ह्यातून विरोधी पक्षनेते झालेले नेते, जे सेनेतून, मनसेत, मनसेतून भाजपात गेले, ते जेव्हा विरोधी पक्षनेते झाले तेव्हा आम्ही त्याचं स्वागतच केलं होतं. मग शासकीय कार्यालयात पालकमंत्री कक्ष स्थापन करण्याच्या निर्णयाचं त्यांनीदेखील स्वागतच करायला हवं”, असं सुनील तटकरे म्हणाले.
प्रवीण दरेकर यांनीअदिती तटकरे यांच्या शासकीय कार्यालयात पालकमंत्री कक्ष स्थापन करण्याच्या निर्णयावर टीका केली होती. त्यांच्या टीकेवर जिल्ह्यात चर्चा सुरु झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.
“प्रत्येक तालुक्यात प्रत्येक तहसील कार्यालयात पालकमंत्री कक्ष असला म्हणजे आपल्याला राजकीय दुकानदारी करता येईल. जनतेच्या हितासाठी कामे करावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलेला नाही. तर राजकीय उद्देशानेच हे सर्व होत आहे”, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला होता.
तसेच “पालकमंत्री कक्षाच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्ह्यातील लेकीन जो उपक्रम सुरु केला आहे, त्याचं जनता स्वागत करत आहे. विरोधी पक्षनेत्यांनीदेखील मोठ्या मनाने त्याचं स्वागत करावं”, असं आवाहन सुनील तटकरे यांनी केलं
Read also:
ठरलं तर..! एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा ‘हा’ मुहूर्त नक्की..? https://t.co/ymQhCnyqX5 @PawarSpeaks @EknathKhadseBJP @BJP4Maharashtra @NCPspeaks
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 20, 2020