सोलापूर : अलिकडेच केंद्र सरकारने पीएफआयवर पाच वर्षासाठी बंदी घातली आहे. त्यानंतर राष्ट्रीय स्वंय संघ म्हणजे आरएसएसवर देखील बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या सोलापुरच्या दौऱ्यावर आल्या असता त्यावेळी त्या बोलत होत्या.
पोहरादेवीच्या यात्रेचा मुहूर्त साधून सेनेत प्रवेश..! बंजारा समाजाचे महंतांचा सेनेला पाठिंबा
केंद्र सरकारने पीएफआयवर लावलेल्या बंदीचे स्पष्टीकरण दिले पाहिजे, तसेच जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अशा बंदीची कोणी मागणी करत असेल तर या मागणीवर चर्चा व्हायला हवी. कुठलीही गोष्ट करताना समाजात त्याची चर्चा झाली पाहिजे. देशात ज्या काही गोष्टी होतील. त्या संविधानाच्या चौकटीत राहून केल्या पाहिजे. सर्वांना समान वागणुक दिली पाहिजे. असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
इकडे आड तिकडे विहिर..! प्रताप सरनाईकांसाठी भाजपचा नवा डाव, शिंदेंनी हात झटकले
गेल्या काही दिसवांत 90 छापे हे विरोधीपक्षाच्या नेत्यांवर पडले आहेत. भाजपा लॉड्रिंत आल्यानंतर अनेकांची सुटका होते, असे भाजपाचेच नेते म्हणतात. मुळात ही महाराष्ट्राची संस्कृती कधीही नव्हती. जे घडतंय ते अत्यंत दुर्दैवी आहे. असंही त्या म्हणाल्या.
Read also
- “शाळेत महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन झालेच पाहिजे”; छगन भुजबळांचा आग्रह
- “पेंग्विन सेनाच महाराष्ट्राची भरभराट करणार”; पेडणेकरांचं भाजपला जोरदार प्रत्युत्तर
- “शिवाजी पार्कवर काॅंग्रेस अन् राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते असणार”; भाजपने सेनेला डिवचलं
- “सरकार पडल्यानंतर तिन्ही पक्षाच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय”; भाजप नेत्याची टिका
- “नागपुरची चड्डी ज्याने घातली, तो थेट संयुक्त सचिव पदावर जातो”; नाना पटोलेंचं वक्तव्य