बुलढाणा : राज्यात सध्या राजकीय वातावरण या ना त्या कारणामुळे सतत चर्चेत राहिलं आहे. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यावरून घमासाम सुरू असताना इकडे भाजप आणि काॅंग्रेसमध्ये देखील जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. नागपुरची चड्डी ज्याने घातली तो थेट संयुक्त सचिव पदावर जातो असं वक्तव्य काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.
“ED पासून सुटका व्हावी म्हणून BJP मध्ये गेले, पण शेवटी भाजपने इडी भीती घातलीच”
बुलढाण्यातील भीमशक्ती कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले यांनी भाजपवर प्रखर शब्दात टिका केली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माध्यमांसमोर येऊन आम्हाला वाचवा असं सांगतात. आता न्यायव्यवस्थाही धोक्यात आली आहे. प्रशासकीय सेवेत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, वन अधिकारी व्हायचं असेल तर तुम्हाला युपीएससीची परिक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. आता तर युपीएससीची परिक्षा नाही, नागपुरची चड्डी ज्याने घातली तो थेट संयुक्त सचिव पदावर जातो असं चित्र पाहत आहोत. असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
“शिंदेंचा दसरा मेळाव्याचा टीझर पाहिला, पण त्यात ‘एक निष्ठ’ शब्द राहून गेला”; सुषमा अंधारे
नाना पटोले यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. आहे. जेव्हापासून सरकार गेलं आहे. तेव्हापासून फक्त काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नव्हे, तर तिन्ही पक्षाच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. आपण काय बोलत आहोत याचंही त्यांना भान राहिलेलं नाही. वसुली कार्यक्रम, बदल्यांचे पैसे, कमिशन मिळणं बंद झालं आहे. त्यात त्यांना माध्यमंही त्यांना विचारत नाहीत. त्यामुळे माध्यमांमध्ये कशाप्रकारे यायला मिळेल यासाठी अशी विधानं करतात असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
वाजत गाजत , गुलाल उधळत या.. पण शिस्तीत..! मेळाव्यासाठी शिवसैनिकांना ठाकरेंचं आवाहन
दरम्यान, हाफ पॅंटच इतकं कौतुक असेल तर एकदा संघाच्या शाखेत यावं, म्हणजे त्यांना देशप्रेम, समर्पित भाव आणि प्रसिद्धीपासून दुर राहून कसं झिजायचं असतं हे कळेलं. आयुष्यात वसुलीच्या पुढे कार्यक्रम केला नाही, हिंदुंचा द्वेष केला, भारताच्या आधी आपला पक्ष अशी भूमिका असणाऱ्या काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडून फार अपेक्षा नाहीत अशी टिका देखील त्यांनी केली आहे.
Read also
- पोहरादेवीच्या यात्रेचा मुहूर्त साधून सेनेत प्रवेश..! बंजारा समाजाचे महंतांचा सेनेला पाठिंबा
- इकडे आड तिकडे विहिर..! प्रताप सरनाईकांसाठी भाजपचा नवा डाव, शिंदेंनी हात झटकले
- वडेट्टीवारांनी कोवीड काळात मृतदेहांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं..! भाजपचा वेढा आता काॅंग्रेसच्या नेत्यावर
- बिगबॉसमध्ये जाणं ही माझ्यासाठी सोन्यासारखी संधी असेल; गुलाबराव पाटील
- “मिंधे गटाची पहिली विकेट गेली, अशा 40 पैकी 39 विकेट जाणार”; रूपाली पाटील