मुंबई : इडीची टांगती तलवार असल्याने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर सरनाईक यांना इडीकडून थोडासा दिलासा देखील मिळाला. यातच आता ओवळा-माजीवाडा मतदार संघ हा भाजपच्या माजी आमदाराला सोडावा, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. ओवळा-माजीवाडा हा मतदार संघ प्रताप सरनाईक यांचा असल्याने एकनाथ शिंदे आणि सरनाईक यांच्यात वाद निर्माण झाले आहेत. यावरून राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादीचा बारामतीतील ओबीसींचा “हा” आक्रमक चेहरा भाजपने फोडला
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर असं म्हणत सत्ता आणि पदासाठी गद्दारी केलेल्यांनामध्ये हा वाद निर्माण होतोच. कारण गद्दारांच्या लालसेला मर्यादा नसते. असं म्हणत काॅंग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच इडीपासून सुटका व्हावी म्हणून भाजपच्या नादी लागले. पण शेवटी पुन्हा भाजपने इडीची भिती घातलीच असा खोचक टोला देखील काॅंग्रेसने त्यांच्यावर लगावला.
गणेशोत्सव अन् नवरात्र उत्सवांप्रमाणे ‘स्वच्छता’ हा देखील एक उत्सव व्हावा ; चंद्रकात पाटील
मिंधे गटाची पहिली विकेट गेली आमदार प्रताप सरनाईक यांना स्वतःच्या मतदार संघात भाजपा उमेदवाराच्या प्रचाराच्या शुभेच्छा. अशा 40 पैकी 39 विकेट जाणार. असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी दिला आहे. विशेष करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील प्रताप सरनाईक यांच्यावर दबाब टाकत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच हा मतदार फोडण्यासाठी प्रताप सरनाईक यांच्या निकटवर्तींना भाजपकडून आमीष देखील दाखवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
गणेशोत्सव अन् नवरात्र उत्सवांप्रमाणे ‘स्वच्छता’ हा देखील एक उत्सव व्हावा ; चंद्रकात पाटील
याबाबत प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांना जाब विचार असल्यास त्यांच्यात शाब्दिक चकमक देखील बघायला मिळाली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आतापासूनच फटाके फोडत असल्याने शिंदे गटात चिंतेचं वातावरण तयार झालं आहे.
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर! pic.twitter.com/oRwWgnbtPV
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) September 30, 2022
Read also
- “शिंदेंचा दसरा मेळाव्याचा टीझर पाहिला, पण त्यात ‘एक निष्ठ’ शब्द राहून गेला”; सुषमा अंधारे
- वाजत गाजत , गुलाल उधळत या.. पण शिस्तीत..! मेळाव्यासाठी शिवसैनिकांना ठाकरेंचं आवाहन
- ममता बॅनर्जी, मायावती, केजरीवाल यांचा दाखला देत फडळकरांचा सुळेंना टोला; म्हणाले..
- “निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार..;” दसरा मेळाव्याचा शिवसेनेचा टीझर रिलीज
- सरनाईकांचा मतदार संघ भाजपला हवा..! शिंदे प्रताप सरनाईक यांच्यात कडाक्याचे भांडण