मुंबई : शिवाजी पार्क येथील मैदानावर दसरा मेळावा कोण घेणार? याचं उत्तर सगळ्यांच लागून राहिलं होतं. महापालिकेने शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचा अर्ज फेटाळ्याने ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्क येथे दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे.
“एकनाथ शिंदेंच्या सभा म्हणजे बाळसाहेबांच्या सभा आहेत की काय असा भास होतो”; उदय सामंत
एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ असं म्हणत शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात शिवसैनिकांना आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा, हिंदवी तोफ पुन्हा ध़डाडणार असं म्हणत बी. के. सी मैदानात सायंकाळी पाच वाजता हा दसरा मेळावा होणार असल्याचं टीझरमध्ये म्हटलं आहे.
वसंत मोरेंचा दिलदारपणा..! स्मशानात मयत घेऊन जाताना आजोबा खडकावर पडले अन्…;
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या देखील दसरा मेळाव्याचा टीझर आज रिलीज करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राची ताकद दिसणार ऐतिहासिक दसरा मेळावा असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी वाजत गाजत , गुलाल उधळत या.. पण शिस्तीत या असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. एक नेता, एक झेंडा, एक मैदान…. शिवसेनेच्या पारंपारिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा. असं देखील त्यात म्हटलं आहे. शिवसेनेचा हा दसरा मेळावा 5 आक्टोंबर रोजी सायंकाळी 06:30 वाजता होणार आहे.
वसंत मोरेंचा दिलदारपणा..! स्मशानात मयत घेऊन जाताना आजोबा खडकावर पडले अन्…;
बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे यांच्या गटाचा 5 ऑक्टोंबर रोजी पाच वाजता होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून शिंदे गटातील नेत्यांना 3 लाख लोकसंख्या जमा करण्याचं टार्गेट दिलं आहे. त्यांची जोरदार तयारी सूरू आहे. तसेच शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांचा रात्री आठ वाजता होणार आहे. त्यामुळे दसरा मेळव्यासाठी जोरदार रंगत येणार आहे.
वाजत गाजत, गुलाल उधळत या… पण शिस्तीत या! 🚩 https://t.co/KyQWJVymZG
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) September 30, 2022
Read also
- सरनाईकांचा मतदार संघ भाजपला हवा..! शिंदे प्रताप सरनाईक यांच्यात कडाक्याचे भांडण
- राष्ट्रवादीचा बारामतीतील ओबीसींचा “हा” आक्रमक चेहरा भाजपने फोडला
- गणेशोत्सव अन् नवरात्र उत्सवांप्रमाणे ‘स्वच्छता’ हा देखील एक उत्सव व्हावा ; चंद्रकात पाटील
- “एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ”; शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज
- “हे हिंदुत्वाचे सरकार आहे, इथे भक्तांचाच आवाज ऐकला जाईल;” तुषार भोसले