पुणे : मनसेचे पुण्यातील फ्रायर ब्रॅॅंडनेते म्हणून ओळख असलेले वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते नेहमी सोशल मीडियावर सक्रीय राहून लोकांच्या चर्चेत असतात. परंतु यावेळी ते एका वेगळ्या कामानिमित्ताने चर्चेत आले आहेत. वृद्धापकाने निधन झालेल्या एका व्यक्तीला स्मशानात नेतांना एका वृद्ध खडकावर पडले. त्यानंतर त्यांना स्वत: च्या खर्चातून स्मशानाकडे जाण्यासाठी रस्त्या बांधून दिला.
“बोके खोके देत आहेत, त्या आमिषाला बळी पडू नका”; चंद्रकांत खैरे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन
वंसत मोरे यांनी याप्रकरणाबाबत एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, ठरवले तर काहीही शक्य असते! त्याचे झाले असे, आमचे जावई आणि गुजर-निंबाळकरवाडीचे उपसरपंच पै. गणेशशेठ काळे यांचे आजोबा व वस्ताद विठ्ठलराव काळे यांचे वडील कै. श्री. विनायक काळे २० सप्टेंबरला वृद्धापकाळाने निधन झाले. मयत २१ ला सकाळी झाली, मीही मयतीला हजर होतो. जाताना डोळ्यादेखत एक भजनकरी काका खूप जोरात तिकडच्या खडकावर पडले. त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात वाचले.
“शरद पवारांचं नाव अन् काम वापरून तुम्ही किती दिवस मोठे व्हाल?”
गुजर-निंबाळकरवाडी हे नवीन समाविष्ट गाव! विविध खात्यांना फोन केले, निधी मागितला पण सध्या प्रशासक असल्यामुळे एक रुपयाही मिळेना आणि ते काका पडलेले पाहिले होते सारखे सारखे तेच दृश्य नजरेसमोर येत होते म्हणून मी निर्णय घेतला. अवघ्या ४ दिवसात माझ्या स्वखर्चाने सगळी कामे मी स्वतः उभी राहून करून घेतली. असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“शिरूरच्या राजकारणात अशी गद्दार लोकं आढळता कामा नये”; ठाकरेंचा आढळराव पाटलांवर निशाणा
दरम्यान, गेल्या अनेक महिन्यापासून या ना त्या कारणाने वंसत मोरे राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिले आहेत. मध्यंतरी त्यांनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भातील भूमिकेसंदर्भात त्यांच्यावर मनसे नाराज होती. मात्र तरी देखील त्यांनी मनसे सोडली नाही आणि आपल्या लोकांसाठी ते नेहमी अशी मदत करीत आहेत.
ठरवले तर काहीही शक्य असते!
त्याचे झाले असे, आमचे जावई आणि गुजर-निंबाळकरवाडीचे उपसरपंच पै. गणेशशेठ काळे यांचे आजोबा व वस्ताद विठ्ठलराव काळे यांचे वडील कै. श्री. विनायक काळे २० सप्टेंबरला वृद्धापकाळाने निधन झाले. मयत २१ ला सकाळी झाली, मीही मयतीला हजर होतो.
१/३ pic.twitter.com/t7nYxAKzFQ— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) September 29, 2022
Read also
- “भाजप, काॅंग्रेस, राष्ट्रवादी सगळेच पक्षातील नेते करताहेत सेनेत प्रवेश”; ठाकरेंचं बळ होतंय दुप्पट तिप्पट
- “ज्यांनी शिक्षणाची दारी खुले केली, ते देखील आपले देव”; भुजबळांचं भाजपला प्रत्युत्तर
- “मी ढळलो नव्हतो, पक्षाने मला ढळायला लावलं”; आढळराव पाटलांचं ठाकरेंना तिखट प्रत्युत्तर
- “राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा रामदास कदम त्यांच्या बंगल्यावर..;” राऊतांचा गंभीर आरोप
- “ऐन सणाच्या तोंडावर केंद्र सरकारने महिला वर्गाची अक्षरशः चेष्टाच केली”; सुप्रिया सुळे