मुंबई : ज्या सरस्वती, शारदे देवीला आपण कधी पाहिलं नाही, तिने काही शिकवलं नाही आणि शिकवलंच तर फक्त 3 टक्के लोकांनाच शिकवलं. मग त्यांचे फोटो शाळेत का लावायचे? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. त्यावर विरोधी पक्षांनी जोरदार टिका केली होती. तसेच हिंदुत्वाच्या देवांचा अपमान केला म्हणून भुजबळांनी माफी मागण्याची मागणी भाजपने केली होती. त्यावर आता छगन भुजबळ यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.
“शिरूरच्या राजकारणात अशी गद्दार लोकं आढळता कामा नये”; ठाकरेंचा आढळराव पाटलांवर निशाणा
शाळेच्या पहिल्या दिवशी आपण सरस्वती देवीची पूजा करतो. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, फातिमा शेख, अण्णासाहेब कर्वे आणि अशा कित्येकांनी आपल्याला शिक्षणाची कवाडं खुली करून दिली. मग त्यांची पूजा का करू नये असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. ज्यांनी आपल्यासाठी शिक्षणाची दारी खुले केली, ते देखील आपले देव आहेत. आपल्यापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रचंड विरोध सहन केला. एवढ्या त्रासातून त्यांनी आपल्याला शिक्षण दिले. त्यामुळे त्यांची पूजा केली पाहिजे, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली.
“शिवसेनेला लागलेली गद्दारीची कीड रामदास कदमांनीच रूजवली” राऊतांचा हल्लाबोल
महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर राजकारण केले जात आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधून आपली भूमिका सपष्टपणे विशद केली. या विषयाला जो राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय अशी भूमिका घेणाऱ्यांची छगन भुजबळ यांनी कान उघडणी केली. मी सुद्धा हिंदू आहे असे बोलत अनेक देवस्थानांमध्ये केलेल्या विकासकामांचा दाखला त्यांनी दिला. आपल्याला ज्यांनी शिक्षणाची दारे उघडी केली त्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी बाजूला ठेवणे योग्य नाही, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
Read also
- “मी ढळलो नव्हतो, पक्षाने मला ढळायला लावलं”; आढळराव पाटलांचं ठाकरेंना तिखट प्रत्युत्तर
- “राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा रामदास कदम त्यांच्या बंगल्यावर..;” राऊतांचा गंभीर आरोप
- “ऐन सणाच्या तोंडावर केंद्र सरकारने महिला वर्गाची अक्षरशः चेष्टाच केली”; सुप्रिया सुळे
- “बोके खोके देत आहेत, त्या आमिषाला बळी पडू नका”; चंद्रकांत खैरे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन
- “शरद पवारांचं नाव अन् काम वापरून तुम्ही किती दिवस मोठे व्हाल?”