लातूर : दसरा मेळाव्यासाठी न्यायालयाने शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरेंना परवानगी दिल्याने त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील बीकेसी मैदानावर दसरा मेळवा होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहण्यासाठी दोन्ही बाजूंनी हालचाली सुरू आहे. यावर आता सेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी कार्यकर्त्यांना दसरा मेळाव्यासाठी येण्याचं आवाहन केलं आहे.
महिला आरोग्याच्या संदर्भात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेणार; आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत
सध्या महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण जोरात सुरू आहे. बोके खोके देत आहेत, त्या आमिषाला बळी पडू नका. शिवसेना फोडणारे माझे शत्रू आहेत. मी कायम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आपणही भगव्या झेंड्याशी प्रतारणा करत गद्दारी करू नका, असे आवाहन शिवसेना नेते तथा मराठवाडा संपर्कप्रमुख चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना लातूर ग्रामीण जिल्हा आढावा बैठकीत येथील भागीरथी मंगल कार्यालय, उदगीर शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना केले.
ठरलं तर..! शिवसेना नेमकी कुणाची? निवडणुक आयोगाने केलं स्पष्ट
यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले, ५ तारखेला दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्क, शिवतीर्थ येथे होणार आहे. आपण दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहून विचारांचे सोने लुटण्यासाठी दसरा मेळाव्यात शिवतीर्थ येथे वाजत गाजत व शिस्तीत या. आगामी काळात होऊ घातलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत आपली ताकत दाखवून जास्तीत जास्त सदस्य निवडून देण्यासाठी प्रयत्न करा असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर युवा सेनेचे राज्य विस्तारक विपुल पिंगळे, शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, महिला जिल्हा संघटिका डॉ. शोभा बेंजरगे, सुनीता चाळक यांनी मनोगत व्यक्त केले. तर, प्रास्ताविक तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी केले. सूत्रसंचालन नीलेश मद्रेवार गणेश माने यांनी केले.
Read also
- “शरद पवारांचं नाव अन् काम वापरून तुम्ही किती दिवस मोठे व्हाल?”
- “शिरूरच्या राजकारणात अशी गद्दार लोकं आढळता कामा नये”; ठाकरेंचा आढळराव पाटलांवर निशाणा
- “शिवसेनेला लागलेली गद्दारीची कीड रामदास कदमांनीच रूजवली” राऊतांचा हल्लाबोल
- “मुंबईत महानगरपालिकेत पैसे खाणारे कोण बोके होते? हे मला माहितीय”; उदय सामंत
- “अंगाला हळद लावून बसलेले बच्चू कडू लग्न लवकर होईना म्हणून..;” राष्ट्रवादीने डिवचलं