मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदारांनी बंड पुकारला. मात्र त्यानंतर बंडखोर आमदारांना शिवसैनिकांकडून तसेच उद्धव ठाकरेंच्या रोषाला समारे जावे लागले. अनेक सभांमधून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर तुटून पडताना दिसत आहेत. यातच आता शिरूर मतदार संघातील काही कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी त्यांनी सेनेचे बंडखोर नेते शिवाजीराव आढळराव पाटलांवर त्यांनी निशाणा साधला.
मी एक गोष्ट तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो की, देवाने ही आपल्याला दिलेली संधी आहे. आपल्यावर हिंदुत्त्व आणि लोकशाही टिकवण्याची आणि वाढवण्याची जबाबदारी आहे. मध्यंतरी हिंदुत्वाच्या खोटेगिरीचा जो कळस गाठला गेला, ते म्हणजे इतिहासातील तोतयाच्या बंडासारखा प्रकार होता, असं म्हणत त्यांनी बंडखोरांना धारेवर धरलं आहे.
“शरद पवारांनी फक्त एक महाराष्ट्राचा दौरा केल्यावर लगेच ते सत्तेवर बसतात”; सुप्रिया सुळे
तसेच शिरूर मतदारसंघातील काही लोकं ढळली पण खरी अढळ लोकं माझ्यासोबत कायम आहेत. नाव एक आणि करायचं दुसरंच, असा हा प्रकार झाला. शिरूर मतदारसंघात शिवसेनी किल्ला आहे. या किल्ल्याच्या नावाला बट्टा लागणे हा शिवसेनेचा अपमान आहे. त्यामुळे यापुढे शिरूरच्या राजकारणात अशी गद्दार लोकं आढळता कामा नये, असं ठाकरेंनी शिवसैनिकांना सांगितले.
6 जिल्ह्याचे पालकमंत्री पद सांभाळायला ‘फडणवीस’ ‘स्पायडरमॅन’ आहेत का ? नाना पटोले
दरम्यान, शिवसेनेचा येत्या 6 ऑक्टोंबर रोजी दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे गट बीकेसी मैदान तर उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्या घेण्याची परवानगी दिली आहे. दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदेंनी गर्दी जमवण्यीची जोरदार तयारी सुरू केली आहे. तसेच त्यांनी महामंडळाच्या अनेक बस देखील बुक केल्या आहेत.
Read also
- “शिवसेनेला लागलेली गद्दारीची कीड रामदास कदमांनीच रूजवली” राऊतांचा हल्लाबोल
- “मुंबईत महानगरपालिकेत पैसे खाणारे कोण बोके होते? हे मला माहितीय”; उदय सामंत
- “अंगाला हळद लावून बसलेले बच्चू कडू लग्न लवकर होईना म्हणून..;” राष्ट्रवादीने डिवचलं
- महिला आरोग्याच्या संदर्भात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेणार; आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत
- ठरलं तर..! शिवसेना नेमकी कुणाची? निवडणुक आयोगाने केलं स्पष्ट