IMPIMP
Thackeray's expulsion of Eknath Shinde cannot be accepted," Rahul Narvekar's big statement Thackeray's expulsion of Eknath Shinde cannot be accepted," Rahul Narvekar's big statement

” ..म्हणून ठाकरेंनी केलेली एकनाथ शिंदेंची हकालपट्टी मान्य करता येणार नाही,” राहुल नार्वेकरांचं मोठं विधान

मुंबई : पक्षप्रमुख म्हणून एकटेच निर्णय घेऊ शकत नाहीत. यामधून उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीचा पाठिंबा नव्हता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना पक्षातून काढण्याचे अधिकार एकट्या उद्धव ठाकरे यांना घेता येणार नाही. नेते आणि पदांची रचना यानुसार खऱ्या पक्षाचा निर्णय होणार आहे. खरी शिवसेना कोण हे शिवसेनेच्या घटनेवरूनच ठरवणार आहे.  असं मोठं विधान विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं आहे. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावरील निकालाचं वाचन विधीमंडळात सुरू आहे.

विधीमंडळात राहुल नार्वेकर म्हणाले की, पक्षप्रमुखाला थेट कुणालाही पक्षातून काढता येत नाही. एकनाथ शिंदेंना काढण्याचा ठाकरेंना कोणताही अधिकार नाही. राष्ट्रीय कार्यकारिणीसोबत चर्चा करूनच पक्षातून हकालपट्टीचा निर्णय घेता येतो. शिवसेना पक्ष प्रमुखांना कोणालाही पक्षातून काढण्याचे अधिकार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना विधीमंडळ गटनेतेपदावरून हटवण्याचा अधिकार नाही. असे  राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, २२ जून २०२२ रोजी विधानसभा अध्यक्ष या नात्यानं माझ्यासमोर आलेले मुद्देही महत्वाचे आहेत. शिवसेना कुणाची ? याचं उत्तर त्यांच्या पक्ष नेतृत्वाच्या निवड पद्धतीवर अवलंबून आहे. साल २०१८ मधील नेतृत्व निवड ही पक्षाच्या घटनेला धरून होती हे प्रमाण मानायची का ? असाही सवाल होता. पक्षप्रमुख ही राष्ट्रीय कार्यकारणी प्रमुख महत्वाचा मानायचा हा कळीचा मुद्दा होता असेही ते म्हणाले.,