मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. त्याचा दुसरा भाग आज देखील प्रकाशित करण्यात आला. आता यावरून भाजपने आणि मनसेने उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. यावरून आता काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या मुलाखतीचा भाग ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.
“महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेचं तुफान निर्माण कराव लागेल”; उद्धव ठाकरे
शिवसेनेचे आमदार शहाजी बापू यांचा गुवाहाटी येथील प्रसिद्ध डॉयलागच्या अनुषंगाने भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट केलं. त्यात त्यांनी काय ते प्रश्न… काय ती उत्तरं.. काय ती घरातल्या घरात मुलाखत… कौटुंबिक कार्यक्रम एकदम ओक्के, असं म्हणत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्याचबरोबर अनेक भाजपच्या नेत्यांनी याच पद्धतीचा आशाय वापरून उद्धव ठाकरेंवर टिका केली होती.
“देव करो, तुम्हाला पुढचं बोधचिन्ह खंजिरच मिळो”; सुधीर मुनगंटीवारांचा शिवसेनेला चिमटा
चित्रा वाघ यांच्या ट्विटवर सचिन सांवत यांनी खोचक शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. त्यात त्यांनी नरेंद्र मोदी यांची अभिनेते अक्षय कुमार यांनी घेतलेल्या मुलाखतीचा काही भाग अपलोड करत त्यावर म्हटलं आहे की, बरोबर आहे, मुलाखत पंतप्रधानांची घेतात तशी हवी….. काय ते देशहिताचे प्रश्न, काय ती जनहिताची उत्तरे, काय ती पंतप्रधान निवासातील मुलाखत, राष्ट्रीय कार्यक्रम एकदम ओक्के. असं म्ङणत त्यांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
“उद्धव ठाकरेंनी अनेकांना मारण्याच्या सुपाऱ्या दिल्या”; राणेंनी यादीच वाचून दाखवली
दरम्यान, अक्षय कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मागील काही वर्षात मुलाखत घेतली होती. त्यात देशहिताच्या प्रश्नांकडे डोळेझाक करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक आयुष्यसंदर्भात प्रश्न विचारले होते. त्यावरून अक्षय कुमार सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला होता.
Read also
- उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांकडून मोठं गिप्ट; सदस्य नोंदणीचे अर्ज अन् शपथपत्राचे मोठे गठ्ठे भेट
- “तुमच्या मनात बाळासाहेब ठाकरेंबाबत इतका पझेसिव्ह पणा का?” मनसेचा सवाल
- ‘शिवसेना पक्षप्रमुख’ असा उल्लेख टाळत शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
- “युती झाली तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी देश सांभाळा म्हटलं होतं, यांनी तर..”; ठाकरेंचा भाजपवर निशाणा
- “त्या अश्रूंची किंमत या विश्वासघातक्यांना चुकवायला लागणारच”; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल