कोल्हापूर: सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यानंतर, आता मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक झाला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात आज म्हणजेच १६ जूनपासून कोल्हापुरात मराठा मूक मोर्चाला सुरुवात होत आहे. संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळाच्या ठिकाणी पहिले आंदोलन होत आहे. या आंदोलनाला वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर कोल्हापुरात सुद्धा दाखल झाले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनस्थळी येऊन मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला. मी आधीही सांगितले आहे, आणि आताही सांगतोय आमचा मराठा आंदोलनाला पाठिंबा असणार आहे. सेच सरकार कमी पडलं म्हणून ही परिस्थिती उद्भवली. मराठा समाजाला योग्य मार्गाने आरक्षण मिळेल, ‘तो’ मार्ग सरकारने निवडावा, तसेच आरक्षणाबाबत जुन्या-नवीन सरकारने ज्या दक्षता घ्यायला हवी होती ती घेतली गेलेली नाही, असंही ते म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर कोल्हापूर येथे मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी खा. संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षण मूक मोर्चात सहभागी झाले आहेत. @Prksh_Ambedkar @YuvrajSambhaji pic.twitter.com/p1c3bBVbNT
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) June 16, 2021
हे पण वाचा: आमच्याकडे चावी आहे, मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्हीच उघडू – संजय राऊत
मराठा आरक्षणासाठीचा हा राज्यातील पहिला मराठा मोर्चा कोल्हापुरात निघत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाची दिशा जाहीर केली आहे. हे आंदोलन मूक असेल. या मराठा मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक यासारख्या सर्व आमदार-खासदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच कोल्हापुरातील आमदार, खासदारांनीही मूक मोर्चाला उपस्थिती लावली आहे.
हे पण वाचा: कोल्हापूरात भर पावसात मुक मोर्चाला, सर्वपक्षीय नेत्यांचा आंदोलनाला पाठिंबा
कोल्हापुरात कडेकोट पोलिस बंदोबस्त
मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात होणाऱ्या आंदोलनाला राज्यभरातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोरोना संकटाचे सर्व नियम पाळून आंदोलन व्हावे, असे आवाहन कोल्हापूर पोलिस दलाकडून करण्यात आले आहे.