IMPIMP
The responsibility of various departments has been entrusted to 'six' ministers in the state, read in detail The responsibility of various departments has been entrusted to 'six' ministers in the state, read in detail

राज्यातील ‘सहा’ मंत्र्यांवर सोपविली विविध खात्याची जबाबदारी, वाचा सविस्तर

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा रविवारी शपथविधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी मंत्र्यांचे खातेवाटप जाहिर करण्यात आले. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप करताना जुन्या मंत्रिमंडळातील अनुभवी चेहऱ्यांकडे पुन्हा तीच खाती देण्यात आली तर पुर्वीच्या मंत्रिमंडळातील एकूण ११ मंत्र्यांना पुन्हा  एकदा तीच खाती सोपवण्यात आली आहेत. अशातच महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांना देखील खातेवाटप करण्यात आले.

हेही वाचा…“राज्यात शिंदे-ठाकरे विधानसभेला पुन्हा एकत्र येणार” ? शिंदेंच्या नेत्यांनी दिला मोठा दुजोरा 

महाराष्ट्रातील भाजपचे खासदार नितीन गडकरी यांच्याकडे पुन्हा तेच रस्ते वाहतूक मंत्रालय देण्यात आलं. तर पीयुष गोयल यांच्याकडे वाणिज्य खातं सोपवण्यात आलं. रामदास आठवले यांच्याकडे पुन्हा सामाजिक न्याय राज्यमंत्रीपदाचा कार्यभार सोपविण्यात आला. तसेच नव्याने सामील झालेल्या प्रतापराव जाधवांकडे स्वतंत्र प्रभाराचं .युष मंत्रालय सोपवण्यात आलं. तर रक्षा खडसे यांच्याकडे क्रीडा व युवक राज्यमंत्री पद , तर मोहोळांकडे सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपविण्यात आला.

हेही वाचा..शिंदे गटानंतर आता अजित पवार गटातही मंत्रीपदावरून खदखद, आण्णा बनसोडे थेट स्पष्टच बोलले 

दरम्यान, राजनाथ सिंह यांना सरंक्षण, अमित शाह यांच्याकडे गृह व सहकार, निर्मला सीतारमण यांच्याकडे अर्थ, एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार, अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे, माहिती व प्रसारण, पीयुष गोयल यांच्याकडे वाणिज्य,  सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे बंदरे, धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे शिक्षण, जुएल ओराम यांना आदिवासी विकास, हरदीपसिंह पुरी यांच्याकडे पेट्रोलियम, तर किरेन रिजीजू यांच्याकडे संसदीय कार्य मंत्रालयाची जबाबदारी पुन्हा एकदा सोपविण्यात आली आहे.

READ ALSO :

हेही वाचा..राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी मोहोळांकडे सहकार खाते, भाजप नेतृत्वाची महाराष्ट्रात मोठी खेळी 

हेही वाचा…“बारामतीचा दादा आता बदलायला हवा, युगेंद्र पवारांना विधानसभेची उमेदवारी द्या,” शरद पवारांकडे कार्यकर्त्यांची मागणी 

हेही वाचा..पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी तातडीने उपाययोजना करा..! मंत्रीपदाची शपथ अन् पहिल्याच दिवसापासून कामाला सुरुवात 

हेही वाचा…“लोकसभेसारखं विधानसभेच्या जागावाटपाचं गुऱ्हाळ शेवटपर्यंत चालून नका,” भुजबळांनी आधीच सगळं केलं स्पष्ट 

हेही वाचा..“धनंजय मुंडे, आता सुट्टी नाही हं..! सर्दी, पडसं झालं असं आम्ही ऐकणार नाय”, तटकरेंनी चांगलंच सुनावलं