पुणे : आमदार महेश लाडगे यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात गालबोट लागल्याने विवाह सोहळा आळंदीत अगदी साध्या पद्धतीने करावा लागला. त्यामुळे टिकेचे धनी ठरलेल्या आमदार लांडगेंबद्दल चंद्रकांत पाटलांना विचारले असता, मी त्यांचे समर्थन करत नाही, परंतू, आमदार लांडगेंनी कोरोना काळात स्वत;चा जीव धोक्यात घालून पिंपरी चिंचवडकरांसाठी अनेक चांगली कामे केली, हे जनतेलाही माहिती आहे, तुम्ही एकदा टिव्हीवर का नाही दाखवतं, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. अशा वेळी जनतेला दिलासा देण्याच्या उद्देशाने आमदार महेश लांडगे यांनी स्वत;च्या जीवाची पर्वा न करता अनेक सकारात्मक कारगिरी बजावली. रेमडेसीवीर, ऑक्सिज, प्लॉझासाठी वनवन भटकणाऱ्या पिंपरी चिंचवडकरांना कोणी मदतीचा हात द्यायला तयार नव्हेत, अशावेळी आमदार लांडगेंनी शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांतील ऑक्सिजन साठा पुरवण्यात हयगय करणाऱ्या जिल्हा प्रशासन तसेच अन्न औषध प्रशासनाला खडोबोल सुनावल्याने अखेर त्यांना नमते घ्यावे लागले होते. शिवाय एप्रिल महिन्याच्या मध्यंतरी ऑक्सिजनची प्रचंड ताणाताण होत असताना जिल्हा प्रशासनाने शहरासाठी दोन टँकर ऑक्सिजन साठा उपलब्ध करुन दिलेला असताना प्रशासनाकडून पुरवण्यात येणारा ऑक्सिजन टँकर पुण्याकडे वळवण्यात आला होता. आमदार लांडगेंनी पिंपरी चिंचवडकरांच्या हक्काचा टँकर अर्ध्या रात्री खेचून आणला होता. दरम्यान, काल मांडव डहाळे कार्यक्रमात उपस्थितांसोबत ठेका धरल्यानंतर आमदार लांडगे यांनी कोरोना नियमावलीचे उल्लंघन केले आहे. तसेच, गर्दी जमवून कोरोना प्रसार होईल, असे वर्तन केले आहे, असा आरोप पोलिसांचा आहे. याप्रकरणी आमदार लांडगेसह इतर ४० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचबरोबर पिंपरी-चिंचवडच्या सार्वजनिक आरोग्याच्या हिताचा प्रकल्प असलेल्या ‘औषधी उद्यान’ ला वाचवण्यासाठी महापालिका ‘एमआयडीसी’ प्रशासनाला रितसर पत्रव्यवहार करणार आहे. तसेच, ‘निमा’ संस्था आणि आमदार महेश लांडगे एकत्रितपणे न्यायालयीन लढा उभारला होता. त्यांच्या या पाठपुरवठ्याला यश आले होते. शिवाय १ मेपासून सुरू झालेल्या १८ ते ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी शहरातील सर्व नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यासाठी सर्वात प्रथम भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका प्रशासनाकडे मोफत लसीकरणासाठी धाव घेतली होती. एवढेच नाही तर पिंपरीतील एचए कंपनीला लस उत्पादनासाठी परवानगी मिळवून देण्यासाठी लांडगेंनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांपर्यंत पाठपुरवठा करून सकारात्म प्रतिसाद मिळवून आणला.
आमदार महेश लांडगेंनी कोरोना काळात बजावलेली महत्वाची भूमिका बघणे गरजेचे ठरते. मुलीच्या लग्न सोहळ्यात लांडगेंकडून नियमांचे उल्लंघन झाले याचे मी मुळीच समर्थन करीत नाही. परंतू, त्यांनी केलेली महत्वाची कामगिरी टिव्हीवर का दाखवत नाहीत?, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
आमदार महेश लांडगेंना कोरोनाची लांगण
कोरोना काळात सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या आमदार महेश लांडगेंना देखिल कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरे झाले आणि पुन्हा जनसामांन्याच्या मदतीला धावून आले. दरम्यान,काही दिवसांपूर्वी त्यांच्या निकटवर्तीयांना तसेच नातेवाईकांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला होता. यात काही जण दगावले. तसेच शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने आमदार लांडगे यांनी सोशल मीडियातून हतबल होत दु:ख व्यक्त केले होते. तसेच शहरातील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नसल्याचे सांगत त्यांनी संताप व्यक्त केला होता. कोरोना रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले होते. मात्र नियम उल्लंघन केल्याने त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.