अभिनेता सुशांतसिंह राजपूत अत्म्हत्याप्रकरणी रोज नवीन खुलासा होत असतानाच आता आणखी एक माहिती समोर आली आहे. आत्महत्येच्या काही दिवसांआधी सुशांत आणि रिया चक्रवर्ती मध्ये भांडण झल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई पोलिसातील अधिकाऱ्यांनी धक्कादायक माहिती उघडकीस आणली आहे.
रिया चक्रवर्तीने पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात असंही सांगितले आहे की, ‘एकदा घरी पार्टी देण्यात आली होती. त्यावेळी सुशांतची बहिण सुद्धा सहभागी झाली होती.’मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘घरात जेव्हा पार्टी संपली होती तेव्हा सुशांतची बहिण ही रियाच्या रूममध्ये आली होती आणि तिने रियाच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. रियाने दुसऱ्या दिवशी ही गोष्ट सुशांतला सांगितली, पण त्याने या गोष्टीकडे लक्ष न देण्याचा सल्ला दिला.’
‘सुशांत आणि रिया चक्रवर्तीमध्ये आत्महत्येपूर्वी कडाक्याचे भांडण झाले होते. एकमेकांच्या कुटुंबीयांच्या विषयावरुन दोघांमध्ये वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला होता की, दोघांनी एकमेकांवर हात उचलला होता. त्यामुळे रागारागा रिया सुशांतचे घर सोडून गेली होती. एवढंच नाहीतर रियाने सुशांतचा नंबरही ब्लॉक केला होता’ अशी माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर 14 जून रोजी सुशांतने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.