पिंपरी चिंचवड : पुणेकरांनी बनविलेल्या कोरोनावरील लसीवर बाहेरून आलेल्यांनी क्लेम करू नये असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली. पुण्याच्या मावळमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. तुमच्या इथे 1400 कोटी, 1500 कोटींच्या गप्पा चालतात. आमच्या दिल्लीत तर एक लाख कोटींच्या गप्पा असतात. या गप्पा कोण मारतं तुम्हाला चांगलं माहीत आहेच.
आज आहेत ‘ते’ आपल्या पुण्यात. बघा ‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं’. जग फिरल्यावर शेवटी आमच्या पुण्यातच लस सापडणार आहे. ही लस पुणेकरांनी शोधलीये, नाही तर कोणीतरी म्हणायचं मीच (स्वतःबाबत) शोधली. पुण्यामध्येच ही लस तयार झालेली आहे, पुणेकरांनी ती लस शोधलेली आहे, त्यामुळे बाहेरून येऊन लसीवर कोणी क्लेम केलं, तर गैरसमज नसावेत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टीका केली आहे.
25 वर्ष कधी उलटतील हे कळणार नाही : सुप्रिया सुळे
आज या सरकारला एक वर्ष पूर्ण होतंय. सुरुवातीला म्हणत होते. सात दिवस टिकेल, सात महिने टिकेल आज तर वर्ष झालं. आता पुढची पाच वर्षेचं नव्हे तर 25 वर्ष कधी उलटतील हे कळणार नाही. सुप्रिया सुळे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यावरही भाष्य केलं. नरेंद्र मोदी शनिवारी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी येणार आहेत. यावेळी ते लसीच्या प्रगतीसंबंधी आढावा घेणार आहेत.
“आपल्या सरकारला एक वर्ष होणार आणि देशाचे प्रधानमंत्री आपल्या जिल्ह्यातल्या ठिकाणी काम होत आहे हे पाहण्यासाठी येणार याच्यापेक्षा काय मोठे यश आपल्या सरकारचे असेल?,” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. “देशाचे प्रधानमंत्री वेगळ्या विचाराचे असले तरी त्यांना आपलं पुणे हवंहवंसं वाटतंय,” असा टोला त्यांनी लगावला.
Read Also :
‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी उद्धव ठाकरेंची अवस्था, नारायण राणेंची टीका
चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरातून निवडणूक लढवली तर त्यांचं डिपॉझिट जप्त होईल : मंत्री हसन मुश्रीफ
सूडाच्या मार्गाने जाण्यास आम्हाला भाग पाडू नका, मुख्यमंत्र्यांचा भाजपला इशारा
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर देहविक्री करणाऱ्या महिलांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा