मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक ते जामीन मंजुरीच्या पहिल्या राजकीय अंकानंतर आता दुसरा अंक सुरु झाला आहे. नारायण राणे म्हणजे भोकं पडलेला फुगा अशी शिवसेनेनं सामनातून त्यांच्यावर टीका केली तर ‘करारा जवाब मिलेगा’ असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
“नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरती करुन शॉक दिला पाहिजे”- गुलाबराव पाटील
आमदार नितेश राणेंनी मनोज वाजपेयीच्या एका चित्रपटातील व्हिडीओ शेअर करत एक ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटमध्ये नितेश राणे म्हणतात की, “मगर आसमान में थुंकने वालों को शायद ये पता नही है, की पलटकर थुंक उन्ही के चेहरे पर गिरेगी…. करारा जवाब मिलेगा… करारा जवाब मिलेगा.”
— nitesh rane (@NiteshNRane) August 24, 2021
सामनाच्या अग्रलेखात नारायण राणे यांच्यावर सडकून टीक करण्यात आली आहे. सामनामध्ये म्हटलं आहे की, “नारायण राणे हे कधीच महान किंवा कर्तबगार नव्हते. शिवसेनेत असताना त्यांचे नाव झाले ते सत्तेच्या शिड्या जलदगतीने चढता आल्यामुळेच. राणे यांनी शिवसेना सोडल्यावर त्यांचा लोकसभा आणि विधानसभेत चार वेळा शिवसेनेने दणकून पराभव केला. त्यामुळं राणे यांचे थोडक्यात वर्णन करायचेच झाले तर भोकं पडलेला फुगा असेच करता येईल.”
भाजप कार्यालयावर कोणी चाल करून याल, तर खबरदार! फडणवीसांचा शिवसेनेला इशारा
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आपल्या जनआशीर्वाद यात्रेच्या दरम्यान महाड येथे सोमवारी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. “स्वातंत्र्यदिनाबद्दल माहिती नसणाऱ्यांनी जास्त काही बोलू नये. यांना स्वातंत्र्यदिन कोणता हे माहित नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती” असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं. त्यावरुन मोठा वाद झाला.
Read Also :
- फुग्याला भोक तुमच्या पडलं, आमच्या नाही; चंद्रकांत पाटीलांचा शिवसेनेवर घणाघात
- फडणवीसांना कायद्याचं चांगलं ज्ञान, पण मी माझ्या आदेशावर ठाम; नाशिक पोलिसांकडून राणेंना नोटीस
- शाब्बास! राणेंच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणाऱ्या युवासैनिकांना उद्धव ठाकरेंची शाबासकी
- पोलीस बळ वापरा अन् अटक करा, करावंच लागेल तुम्हाला; मंत्री अनिल परबांची क्लीप व्हायरल
- राणे प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया, म्हणाले…