मुंबई : भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटलेले असतानाच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली याबद्दलची भूमिका स्पष्ट केली. “राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याच्या पाठिशी भाजप नाही, पण नारायण राणेंच्या खंबीरपणे पाठिशी आहे. वासरु मारलं तर सरकारची गाय मारण्याची भूमिका अयोग्य आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘त्या’ वक्तव्याच्या पाठीशी नाही, पण भाजप नारायण राणेंच्या पूर्णपणे पाठिशी- फडणवीस
“भाजपच्या कार्यालयावर दगडफेक कराल, कोणी चाल करून याल, तर खबरदार! आमच्याकडून हे खपवून घेतलं जाणार नाही. आम्ही दगडफेक करणाऱ्यांना सोडणार नाही,” असा इशारा शिवसेनेला दिला आहे. “शिवसैनिक दगडफेक करत आहेत, ते माध्यमासमोर म्हणतात, आम्ही उद्धवजींच्या आदेशाने करत आहोत. आम्ही हिंसा करत नाही, पण आमच्या कार्यालयावर हल्ला आम्ही सहन करणार नाही,” असं त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्याबद्दल बेताल वक्तव्य; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक होणार?
तसेच, “आम्ही हिंसा करत नाही, पण आमच्या कार्यालयावर हल्ला केला, तर आम्ही सहन करणार नाही. आमच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली गेली नाही, तर आम्ही दोघेही विरोधी पक्षनेते, त्या प्रत्येक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर जाऊन आंदोलन करु. हे कायद्याचं राज्य आहे, तालिबानचं नाही!” असा थेट इशारा त्यांनी राज्य सरकारला देत, भाजप कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचं आवाहन केलं आहे.
नारायण राणेंना अटक करुनच दाखवा; भाजप नेत्यांच सरकारला पुन्हा चॅलेंज
यावेळी, “महाराष्ट्र पोलिसांबद्दल मला नितांत आदर आहे, ५ वर्षे मी त्यांच्यासोबत काम केलं आहे. देशात नि:पक्षपातीपणे काम करणारं पोलीस खातं म्हणून त्यांची ख्याती आहे. पण या सरकारच्या काळात ज्या पद्धतीने त्यांचा ऱ्हास होत आहे, सरकारने बस म्हटल्यावर अधिकारी लोटांगण घालत आहेत. केवळ सरकारला खूश करण्यासाठी कारवाई केली जात आहे. आधीच या सरकारच्या काळात झालेल्या वसुली कांडाने पोलिस दलाबाबतची नजर बदलली आहे,” असं म्हणत त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे.
Read Also :
- “नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरती करुन शॉक दिला पाहिजे”- गुलाबराव पाटील
- राणे “कोंबडी चोर” अन् ठाकरे “घर कोंबडा”; बॅनरबाजीवरून शिवसेना-भाजपात रंगला कलगीतुरा
- खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर समोर या, तुमची औकात दाखवतो – निलेश राणे
- नारायण राणेंची केंद्रीय मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा; शिवसेना खासदाराचे मोंदींना पत्र
- अटक करायला मी काय सामान्य माणूस आहे का? आमचे पण वरती सरकार, बघतोच – नारायण राणे