चिपळून : राज्याच्या मुख्यमंत्र्याला देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे विचारावे लागते. मी तिथे असतो तर कानाखालीच वाजवली असती, असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. नाशिक, पुणे आणि महाडमध्ये राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत युवा सेनेच्या वतीने आंदोलन पुकारलं आहे. यासह राज्यातील शिवसैनिक संतापले आहेत. राज्यात शिवसेना विरुद्ध राणे असा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
म्हाडाचे मंत्री तळियेत फिरकलेच नाहीत! शिवसेना आमदाराचे आव्हाडांना खडेबोल
“मी कुठलाही गुन्हा केलेला नाही, कोण सुधाकर बडगुजर मी ओळखत नाही?, अटक करणार म्हणून चालवताय सामान्य माणूस वाटलो का तुम्हाला? तुम्ही माझी बदनामी केली तर त्याधी माझा गुन्हा तुमच्याविरोधात दाखल होईल” असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी माध्यमांना दिला.
नारायण राणेंना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं आणि त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं – शिवसेना
नाशिकमध्ये भाजपाचे कार्यालय फोडण्यात आले. राज्यात अन्यत्र भाजपा कार्यालयावर हल्ले होतायत. त्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर नारायण राणे म्हणाले की, “मी तुमच्या सांगण्यावर विश्वास ठेवणार नाही. दोन-चार दगड मारण्यात कसला पुरुषार्थ आलाय?” “जे काय करतायत ते करु दे, आम्ही पाहून घेऊ समर्थ आहोत. ज्या वेळी उद्धव ठाकरे थोबडा फोडा म्हणतो, तो गुन्हा नाही का? ते दिवस-रात्र का नाही दाखवत?” असा सवाल राणेंनी केला.
“सण -वार, उत्सव बाजूला ठेऊन कोरोनाला हद्दपार करू,” मुख्यमंत्र्यांचे गोविंदा पथकांना आवाहन
उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानावर ते म्हणाले की, “त्यावेळी मी असतो तर, असं म्हणालो हा गुन्हा होत नाही. मी कानफाटात मारीन हा गुन्हा आहे. वकिलांना विचारा जरा, चेष्टा लावलीय काय?” “मी शिवसैनिकांना भीख घालत नाही. समोर उभं तरी रहावं. पत्र, नोटीस आणि आदेश यात फरक असतो, नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी आदेश काढला, तो राष्ट्रपती आहे की, पंतप्रधान” असा सवाल नारायण राणेंनी केला.
Read Also :
- नाशिकमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे कार्यालय फोडले; शिवसेना- भाजप वाद चिघळला
- नारायण राणेंना अटक करुनच दाखवा; भाजप नेत्यांच सरकारला पुन्हा चॅलेंज
- मुख्यमंत्र्याबद्दल बेताल वक्तव्य; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक होणार?
- पुणे शहरातील अॅमिनिटी स्पेसच्या जागेवर पुणेकरांच्या हितासाठी वाहनतळे उभारा – काँग्रेस
- व्हायरल ऑडिओ क्लिपवर पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंचा मोठा खुलासा, म्हणाल्या…