मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं आहे, त्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं आहे. त्यामुळेच ते एकनाथ शिंदे शिवसेनेवर नाराज असल्याचं म्हणत आहे, अशी जोरदार टीका राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
महिला तहसीलदार ऑडिओ क्लिप प्रकरणात अण्णा हजारेंनी घेतली उडी; काय म्हणाले नेमकं…
शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेवर नाराज असून ते लवकरच भाजपामध्ये येणार असल्याचं खळबळजनक विधान नारायण राणे यांनी केलं होतं. याबाबत गुलाबराव पाटील यांना विचारण्यात आलं असता त्यांनी राणेंवर सडकून टीका केली. “नारायण राणे पहिले किती दिवस अस्वस्थ होते हे आपण पाहिले आहे. त्यामुळे त्यांचा अस्वस्थपणा आता निघाला आहे. आधी ते शिवसेनेत अस्वस्थ होते. मग ते काँग्रेसमध्ये अस्वस्थ झाले आणि आता भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना सूक्ष्म लघू उद्योग खातं मिळालं. त्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं आहे”, असा खरमरीत टोला गुलाबराव यांनी राणेंना लगावला आहे.
परमबीर सिंग-वाझे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ९ लाख वसूल केले, बारमालकाचे गंभीर आरोप
“एकनाथ शिंदे हे शिवसेना नेते आनंद दिघे यांचे चेले आहेत. ठाणे येथे शिवसेनेचा झेंडा तेवत ठेवला त्यांचे शिंदे हे चेले आहेत. त्यामुळे नारायण राणे यांचा शिंदेंबाबतच अंदाज हा हवामान खात्याप्रमाणे चुकीचा ठरणारा आहे”, असंही गुलाबराव पाटील म्हणाले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांची शिवसेनेत घुसमट होत असून ते केवळ सहयांचेच मंत्री आहेत, असा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी केला होता. त्याच पार्श्वभूमीवर नगरविकास खात्यात किंवा आपल्या कामामध्ये मातोश्रीवरुन कोणताही हस्तक्षेप होत नसल्याचा निर्वाळा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केला. समाजमाध्यमांद्वारे त्यांनी आपली ही प्रतिक्रीया व्यक्ती केली.
Read Also :
- म्हाडाचे मंत्री तळियेत फिरकलेच नाहीत! शिवसेना आमदाराचे आव्हाडांना खडेबोल
- शिवसेनेत घुसमट? नारायण राणेंच्या गौप्यस्फोटवर, एकनाथ शिंदे म्हणतात…
- आमदार निलेश लंकेंवर केलेल्या गंभीर आरोपावर सुप्रिया सुळे म्हणातात…
- “उपमुख्यमंत्री अजित पवार हवी तशी साथ देत नाहीत,” यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप
- महिला तहसीलदार ऑडिओ क्लिप प्रकरणात अण्णा हजारेंनी घेतली उडी; काय म्हणाले नेमकं…