अहमदनगर : तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप दोन दिवसांपासून राज्यभरात व्हायरल झाली आहे. यामध्ये देवरे यांनी आमदार निलेश लंके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लंके यांनीही त्या क्लिपवर स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, आमदार लंके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन प्रकरणाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी अण्णांनी या प्रकरणात पारनेर तालुक्याची बदनामी थांबवण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणार असल्याचेही अण्णांनी आमदार निलेश लंके यांना सांगितले आहे.
राज ठाकरेंच्या राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेला, भाजपकडून पहिल्यांदाच दिली गेली प्रतिक्रिया
दरम्यान, या प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या चित्रा वाघ आणि भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई याही देवरे यांच्या बाजूने उतरल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. आज सकाळपासून देवरे यांच्याबाबतचा अहवाल सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तहसीलदार देवरे यांच्या आत्महत्येच्या क्लिपच्या मुळाशी हा अहवालच असल्याचे बोलले जात आहे.
लाच प्रकरण: पिंपरी चिंचवडच्या स्थायीवर सूडबुद्धीनं कारवाई झालेली नाही – अजित पवार
तहसीलदार ज्योती देवरे यांच्याबाबतचा अहवाल अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी 6 ऑगस्टला तयार करून नाशिकच्या विभागीय आयुक्तांना पाठविला होता. त्यानंतर ही क्लिप बाहेर आल्याची चर्चा आहे. या अहवालात जिल्हाधिकारी यांनी म्हंटले आहे की, शासकीय कामात नितांत सचोटी व कर्तव्यपरायणता ठेवलेली नाही. कामाची जबाबदारी नीटपणे पार पाडलेली नाही. वरिष्ठांच्या आदेशाचा भंग केला आहे.
“एकनाथ शिंदे शिवसेनेला कंटाळलेत, त्यांना आमच्यात घेऊ”; राणेंचा मोठा गौप्यस्फोट
पारनेर येथील एका कोविड सेंटर विरोधातील तक्रारीच्या अनुषंगाने तपासणी करताना तहसीलदार देवरे यांनी चौकशी समितीस कोणतेही कागदपत्र उपलब्ध करून दिले नाहीत. यावरून त्यांनी कर्तव्यात, जबाबदारीमध्ये अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचे दिसून येतो, असेही अहवालात नमूद केले आहे. जप्त वाळूसाठ्याबाबत नियमानुसार अंतिम आदेश पारित करून सदर रक्कम शासनाच्या तिजोरीत भरणा करणे अभिप्रेत होते. परंतु या प्रकरणी वालुसाठ्याच्या लिलावबाबत अंतिम आदेश पारित करण्यात आलेले नाहीत. ही बाब शासनाचे नुकसान करणारी असल्याचे ताशेरे अहवालात ओढण्यात आलेले आहेत.
Read Also :
- तर मात्र आपल्याला कदाचित लॉकडाऊन लावावा लागेल”, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
- भाजप नेते रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्यावर गुन्हे दाखल करा – इम्तियाज जलील
- उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींना सांगितली ‘मनातली गोष्ट’! राऊतांचा गौप्यस्फोट
- कोरोना मधून जगायचं, महागाईमध्ये मरायचं; दरवाढी विरोधात पुण्यात राष्ट्रवादीचे जागरण गोंधळ आंदोलन
- रोहित पवारांनी राज ठाकरेंचे ‘कौतुक’ करत काढला भाजपला चिमटा, म्हणाले…