पारनेर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंच्या एका आडिओ क्लिपने सध्या अहमदनगर जिल्हा आणि राज्यात खळबळ उडवून दिली असून, पारनेरच्या लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी यात दिला आहे. यामध्ये त्यांनी थेट कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नाव घेतले नसले, तरी त्यांच्या बोलण्यातून रोख हा स्थानिक आमदार निलेश लंकेकडे असल्याचे दिसून येत आहे, तर निलेश लंकेंनीही उलट ज्योती देवरेंवर आरोप केले आहेत.
“उपमुख्यमंत्री अजित पवार हवी तशी साथ देत नाहीत,” यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप
यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी या प्रकरणाची माहिती काढली असून, मी स्वतः त्यांच्या संपर्कात आहे. जेव्हा विषय एखाद्या महिलेचा येतो, तेव्हा सर्वांनी संवेदनशीलतेने विचार केला पाहिजे. एखादी क्लिप आली तर त्या संदर्भाने लगेच गैरसमज निर्माण होतात. आपण त्या महिलेची प्रायव्हसी देखील जपली पाहिजे. यात आम्ही जातीने लक्ष घालत आहोत, त्यामुळे पसरणाऱ्या अफवांवर कोणीही विश्वासू ठेवू नये,” असं त्या म्हणाल्या.
पारनेर तहसीलदार ज्योती देवरे काल बोलल्या आज महसुल शाखा अहमदनगर चं ८ऑगस्ट चं पत्र आलयं तब्बल १६ आरोप लावलेत….त्याचं उत्तर ज्योती देवरे देतीलचं
पण
५ ऑगस्ट चं पारनेर ग्रामीण रूग्णालय पत्र ज्यात लोकप्रतिनीधीकडनं झालेली मारहाण…काही कार्यवाही केलीत का हो नगर कलेक्टर साहेब तुम्ही ?? pic.twitter.com/UUxkCmjYPM— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 21, 2021
महिला तहसीलदार ऑडिओ क्लिप प्रकरणात अण्णा हजारेंनी घेतली उडी; काय म्हणाले नेमकं…
दरम्यान, भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी देखील यावरून राज्य सरकार आणि निलेश लंकेंच्यावर हल्लाबोल केला असून, त्यांनी ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलेल्या व्हिडिओत, “सत्तेतले हे बेलगाम घोडे…देवमाणूस म्हणून मिरवणाऱ्या पारनेरच्या या लोकप्रतिनिधीच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणाऱ्यांकडून होत आहे का तेच आता पाहायचंय,” असा संताप व्यक्त केला आहे.
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडीयो क्लीप ऐकली…..आणि मन सुन्न झालं
सत्तेतले हे बेलगाम घोडे…देवमाणूस म्हणून मिरवणार्या पारनेरच्या या लोकप्रतिनीधीच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणार्यांकडून होतयं का तेचं आता पहायचयं pic.twitter.com/6WuX2r6sXV
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 20, 2021
ऑडिओ किल्पमध्ये काय आहे?
प्रिय दीपाली चव्हाण घाबरु नकोस मी लवकरच तुझ्या वाटेवर तुला सोबत करण्यासाठी येत आहे. त्याशिवाय दुसरा मार्गच दिसत नाही. तुझ्या वाटेवर दिसते एक आशेची उजळलेली पणती बाकी सारा अंधार दिव्याखालचा. खर तर तु या रस्त्यावरुन गेली तेव्हा मी सूसाईट नोट लिहून रडत कुढत जगणाऱ्या साऱ्या मैत्रिणींना हक्कानं खडसावलं होतं, फुलराणी बना तुला शिकवीन चांगला धडा असे पालुपद गा मी पण तेच पालूपद गात होते. पण लक्षात आले त्याचे परिणाम. किती जणांना धडा शिकवायचा पण या चिमुकल्या पंख्यात आताा त्राण राहिले नाही.
तत्वांना मुरड घालून जगता येत नाही. त्यांचे हुजरी करत तळवे चाटता येत नाही. लोकप्रतिनिधींच्या तालावर नाचता येत नाही, त्यांनी थूंकलेलं मला चाटत येत नाही. उकिरड्यावर उभ्या असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या धिंडी मला रोखता येत नाही. अन् वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडित गाठता येत नाही. त्यांनी तर खिंडित साहाय्य पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचविण्याचे काम केलं. ठिक आहे लोकप्रतिनिधी आणि आपण एक रथ आणि दोन चाक. पण आपल्या चाकांना जरा गती घेतली की आपला घात निश्चित समजावा.
Read Also :
- “एकनाथ शिंदे शिवसेनेला कंटाळलेत, त्यांना आमच्यात घेऊ”; राणेंचा मोठा गौप्यस्फोट
- परमबीर सिंग-वाझे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ९ लाख वसूल केले, बारमालकाचे गंभीर आरोप
- राज ठाकरेंच्या राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेला, भाजपकडून पहिल्यांदाच दिली गेली प्रतिक्रिया
- ब्रेकिंग! पारनेर तहसिलदाराने आमदार लंकेच्या जाचाला कंटाळून दिला आत्महत्येचा इशारा!
- “राणे कुणाच्या धमक्यांना घाबत नाहीत, ते सेनेला जशास तसे उत्तर देतील”, कराडांचा इशारा