पुणे : “भाजप नेते नारायण राणे यांची बोलण्याची स्टाईल आहे. अशा एखाद्या वाक्यावरुन केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक? हे काय चाललंय? प्रत्येक शिवसैनिकाविरोधात खंडणी, बलात्काराचे गुन्हे दाखल होत आहे. त्यावेळी तत्परता का नाही दाखवली? केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक हे सुडापोटी चालू आहे. त्यावरुन जे काय होईल त्याला जबाबदार सत्ताधारी असतील” अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं. तर, नारायण राणेंना अटक करुनच दाखवा, तुमच्यात हिंमत नाही, असं म्हणत भाजप नेते प्रमोद जठार यांनी ठाकरे सरकारला पुन्हा ललकारलं.
“सण -वार, उत्सव बाजूला ठेऊन कोरोनाला हद्दपार करू,” मुख्यमंत्र्यांचे गोविंदा पथकांना आवाहन
“हा राजकीय द्वेषापोटी सत्तेचा दुरुपयोग आहे. नारायण राणेंची बोलण्याची स्टाईल आहे. अशा एखाद्या वाक्यावरुन केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक? हे काय चाललंय? प्रत्येक शिवसैनिकाविरोधात खंडणी, बलात्काराचे गुन्हे दाखल होत आहे. त्यावेळी तत्परता का नाही? केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक हे सुडापोटी चालू आहे. त्यावरुन जे काय होईल त्याला जबाबदार सत्ताधारी असतील” असा इशारा चंद्रकांतदादांनी दिला.
“… तर आमच्याच मंत्र्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे मागू ,” भाई जगतापांचा नितीन राऊतांना इशारा
जन आशिर्वाद यात्रा निघणार. न्यायालयात हे दोन सेकंदात उडणार. हे सगळं भीतीपोटी झालं आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात राणे साहेब जात आहेत. कोकणात शिवसेनेचं वर्चस्वाला हादरा बसत आहे. नारायण राणेंना अटक होईल असं वाटत नाही. न्यायालय योग्य निर्णय देईल. यात्रा सुरु राहील. दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आले तर ही जबाबदारी प्रशासनाची. एखाद्या वाक्यावरुन टोक गाठायचं असेल तर शासनाच्या मनात असंतोष निर्माण करण्याचं आहे हे दिसतंय.
काय होतं राणेंचं वादग्रस्त विधान?
नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेवेळी काल महाड येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर राणे यांनी जोरदार प्रहार केला. मात्र, टीका करण्याच्या नादात राणे यांनी वादग्रस्त विधान केले. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हीरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती, असे नारायण राणे म्हणाले. या पत्रकार परिषदेला भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.
Read Also :
- मुख्यमंत्र्याबद्दल बेताल वक्तव्य; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक होणार?
- पुणे शहरातील अॅमिनिटी स्पेसच्या जागेवर पुणेकरांच्या हितासाठी वाहनतळे उभारा – काँग्रेस
- व्हायरल ऑडिओ क्लिपवर पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंचा मोठा खुलासा, म्हणाल्या…
- “१२ कोटी जनतेला विचारा उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण?” बावनकुळेंचे ठाकरे सरकारला आव्हान
- देशमुखांवर अटकेची टांगती तलवार! ईडीकडून केली गेली पुन्हा मोठी कारवाई