मुंबई : भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटलेले असतानाच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली याबद्दलची भूमिका स्पष्ट केली. “राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याच्या पाठिशी भाजप नाही, पण नारायण राणेंच्या खंबीरपणे पाठिशी आहे. वासरु मारलं तर सरकारची गाय मारण्याची भूमिका अयोग्य आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
मुख्यमंत्र्याबद्दल बेताल वक्तव्य; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक होणार?
“मुळात त्यांच्याकडून हे बोलण्याच्या ओघात झालं असावं. पण जेव्हा मुख्यमंत्री स्वातंत्र्यदिन विसरतात, तेव्हा कोणाच्याही मनात राग निर्माण होऊ शकतो. पण तो वेगळ्या पद्धतीनेही निषेध म्हणून व्यक्त केला जाऊ शकतो. मात्र त्यांच्यावर ज्या पद्धतीनं कारवाई केली जात आहे, ती अवैध आहे. त्याचं बिलकुल समर्थन केलं जाऊ शकत नाहीत. त्यांचं वक्तव्य कायदेच्या भाषेत दखलपात्रं गुन्हा नाही, असं त्यांनी सांगितलं.
नारायण राणेंना अटक करुनच दाखवा; भाजप नेत्यांच सरकारला पुन्हा चॅलेंज
“तुम्ही केंद्रीय मंत्र्यांना ‘निर्लज्ज’ म्हणता, ‘मंत्र्यांना लाथा घाला’ म्हणता, ‘चौकीदार चोर है’ म्हणता, तेव्हा त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत? आमच्या कुटुंबाविरोधात, पत्नीविरोधात तुम्ही काय-काय म्हणता, त्यावर कारवाई होत नाही, अशी दुटप्पी भूमिका चालणार नाही,” असा इशारा देत, “युवासेनेने कार्यक्रम करायचे, त्यांच्यावर कारवाई नाही आणि आमच्यावर कारवाई? हरकत नाही, राणे साहेबांना अटक केली, तरी यात्रा थांबणार नाही. आमची वाटचाल सुरूच राहील,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
अटक करायला मी काय सामान्य माणूस आहे का? आमचे पण वरती सरकार, बघतोच – नारायण राणे
“पोलिसांच्या कारवाईचं मला आश्चर्य वाटतंय. तो शर्जिल उस्मानी राज्यात येतो, भारतमातेला शिव्या देतो, हिंदुंना खुनी म्हणतो, त्याच्यावर कारवाई करताना शेपट्या टाकता आणि आज मात्र आख्खं पोलीस फोर्स राणेंवर कारवाईसाठी निघालं आहे. कायद्याप्रमाणे हा कॉग्निजेबल ऑफेसन्स नाही,” असं म्हणत त्यांनी, “आयुक्त स्वत:ला छत्रपती समजतात का?” असा संतप्त सवाल केला. ज्या पद्धतीने सरकार पोलिसांचा वापर करत आहे, ते योग्य नाही. ही ताकद शर्जिल उस्मानीबाबत दाखवा,” असं आव्हान त्यांनी केलं आहे.
Read Also :
- राणेंच्या घराबाहेर भाजपा आणि युवासैनिकांमध्ये तुफान राडा; दगडफेक आणि पोलिसांचा लाठीचार्ज
- “नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरती करुन शॉक दिला पाहिजे”- गुलाबराव पाटील
- राणे “कोंबडी चोर” अन् ठाकरे “घर कोंबडा”; बॅनरबाजीवरून शिवसेना-भाजपात रंगला कलगीतुरा
- खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर समोर या, तुमची औकात दाखवतो – निलेश राणे
- नारायण राणेंची केंद्रीय मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा; शिवसेना खासदाराचे मोंदींना पत्र