मुंबई : भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटलेले असतानाच, आता मोठी बातमी समोर येत असून, स्थानिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक केली आहे. त्यांना आधी रत्नागिरीच्या सत्र न्यायालयासमोर हजर केले जाणार होते. मात्र आता त्यांचा ताबा महाड पोलिसांना देण्यात येणार असून, त्यांना उद्या रायगड न्यायालयात हजर केले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
ब्रेकिंग! मुख्यत्र्यांवरचं वादग्रस्त वक्तव्य भोवलं, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक
दरम्यान, यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी, नियोजित कार्यक्रमासाठी निघाले असता, निवासस्थानाबाहेर निघताना कारमधूनच माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मी राणेंना महत्त्व देत नाही. त्यावर काय बोलायचं? ते त्यांच्या पद्धतीने चालत आहेत, कदाचित त्यांच्या संस्कारचा तो भाग असावा,” अशी उपरोधिक टीका त्याची राणेंवर केली आहे आणि संपूर्ण प्रकरणावर बोलण्यास नकार देऊन, नियोजित कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी रवाना झाले.
मोठी बातमी! राणेंची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल केले जाण्याची शक्यता
नारायण राणे यांनी, महाडमध्ये ‘जन आशीवार्द’ यात्रेवेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, “मुख्यमंत्र्यांना देशाचा कितवा स्वातंत्र्य दिवस हे आठवत नाही, जर त्या ठिकाणी मी असतो तर कानाखाली खेचली असती,” असं आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर त्यांच्यावर नाशिक, महाड आणि अजून एका ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या वक्तव्यावरून आज मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी शिवसेना आणि शिवसेनेच्या संघटनांकडून आंदोलन केले गेले. त्यामुळे, राज्यभरात मोठया प्रमाणावर तणावपूर्ण वातावरण तयार झाले.
राणेंच्या घराबाहेर भाजपा आणि युवासैनिकांमध्ये तुफान राडा; दगडफेक आणि पोलिसांचा लाठीचार्ज
दरम्यान, गोळवली इथे त्यांना स्थानबद्ध असताना, त्यांची डॉक्ट्रांकडून तपासणी केली गेली होती. नंतर त्यांना संगमेश्वर येथे पोलिसांनी नेले असता, प्रकृतीसंदर्भातली एक मोठी माहिती समोर आली. त्यानुसार त्यांना बीपी आणि शुगरचा त्रास जाणवत असून, त्यांना लवकरच रुग्णालयाच दाखल केले जाण्याची गरज आहे,” अशी माहिती वैद्यकीय पथकातील डॉक्टरनी केली आहे. दुसरीकडे, त्यांच्यावरच्या या कारवाईचे सर्व राज्यस्तरीय भाजप नेत्यांनी तीव्र विरोध केला आहे.
Read Also :
- केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वक्तव्यावर, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया…
- राणेंना जेवण करताना पोलिसांची धक्काबुक्की’, हातातले ताटही ओढले; आमदार प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप
- राणेंना अटक! आता जन आशीर्वाद यात्रेचं काय? फडणवीसांनी सांगितला ‘प्लॅन’
- कुठेही सोशल डिस्टनसिंग नाही सगळीकडे गर्दी, मग आता “करोना हृदय सम्राट”गप्प का?
- पुण्यातल्या आर डेक्कन मॉलवर शिवसैनिकांची दगडफेक; भाजप कार्यलयात कोंबड्या सोडल्या