मुंबई : भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटलेले असतानाच, आता मोठी बातमी समोर येत असून, स्थानिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक केली आहे. त्यांना आधी रत्नागिरीच्या सत्र न्यायालयासमोर हजर केले जाणार असून, हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना नाशिक पोलिसांकडे देण्यात येणार असल्याची शक्यता आहे
मोठी बातमी! राणेंची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल केले जाण्याची शक्यता
मात्र, यामुळे नारायण राणेंच्या नेतृत्वात सुरु झालेल्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेळा खीळ बसली असून, हे प्रकरण आणखीन चिघळले तर यात्रा स्थगित केली जाणार?, की त्यांच्यावरील कारवाईनंतर यात्रा पुन्हा सुरु करण्यात येणार?, की अजून काही निर्णय घेतला जाणार? या सर्व प्रश्नांचा उलगडा फडणवीस यांनी पत्रकार परिषेदतून केला आहे. त्याआधी त्यांनी राणेंच्या विधानाचं असमर्थन केलं असून, भाजप त्यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं.
ब्रेकिंग! मुख्यत्र्यांवरचं वादग्रस्त वक्तव्य भोवलं, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक
यावेळी, त्यांना अटक झाल्यास जनआशीर्वाद यात्रा थांबणार नाही, हे देखील त्यांनी स्पष्ट केलं. “जनआशीर्वाद यात्रा सुरूच राहील. जनआशीर्वाद यात्रा रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, प्रवीण दरेकर या नेत्यांच्या उपस्थितीत पार पडेल,” असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे, आता राणेंच्या अटकेनंतर ‘जन आशीर्वाद’ यात्रा पुढे सुरूच राहणार आहे, हे स्पष्ट झालं आहे. दरम्यान, राणे यांचा ताबा आता महाड पोलिसांकडे दिला जाणार असून, त्यांना महाड कोर्टासमोर दाखल केले जाण्याची शक्यता आहे.
भाजप कार्यालयावर कोणी चाल करून याल, तर खबरदार! फडणवीसांचा शिवसेनेला इशारा
दरम्यान, राणे यांच्या प्रकृतीसंदर्भातली एक मोठी माहिती समोर येत असून, राणे यांची तब्येत खालावली आहे. त्यांना बीपी आणि शुगरचा त्रास जाणवत असून, त्यामुळे, त्यांना लवकरच रुग्णालयाच दाखल केले जाण्याची शक्यता आहे,” अशी माहिती भाजप नेते प्रमोद जठार यांनी दिली आहे. दरम्यान, त्यांच्यावरच्या या कारवाईचे सर्व राज्यस्तरीय भाजप नेत्यांनी तीव्र विरोध केला असून, राणे समर्थक आणि भाजप समर्थकांनी संतप्त होऊन संगमेश्वर पोलीस ठाण्याबाहेर त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.
Read Also :
- कुठेही सोशल डिस्टनसिंग नाही सगळीकडे गर्दी, मग आता “करोना हृदय सम्राट”गप्प का?
- पुण्यातल्या आर डेक्कन मॉलवर शिवसैनिकांची दगडफेक; भाजप कार्यलयात कोंबड्या सोडल्या
- राणेंच्या घराबाहेर भाजपा आणि युवासैनिकांमध्ये तुफान राडा; दगडफेक आणि पोलिसांचा लाठीचार्ज
- ‘त्या’ वक्तव्याच्या पाठीशी नाही, पण भाजप नारायण राणेंच्या पूर्णपणे पाठिशी- फडणवीस
- “नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरती करुन शॉक दिला पाहिजे”- गुलाबराव पाटील