मुंबई : भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटलेले असतानाच, आता मोठी बातमी समोर येत असून, स्थानिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक केली आहे. त्यांना आधी रत्नागिरीच्या सत्र न्यायालयासमोर हजर केले जाणार असून, हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना नाशिक पोलिसांकडे देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
ब्रेकिंग! मुख्यत्र्यांवरचं वादग्रस्त वक्तव्य भोवलं, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक
दरम्यान, यावर आत विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून, मनसेकडून संदीप देशपांडे यांनी, “आज सकाळ पासून महाराष्ट्रा मध्ये कायदा सुव्यवस्था “फाट्यावर”मारून आंदोलन आणि गर्दी जमवली जात आहे. कुठेही सोशल डिस्टनसिंग नाही गर्दी च गर्दी अस असून “करोना हृदय सम्राट”गप्प का?आणि हो सोशल डिस्टनसिंग चा फज्जा म्हणणारे पत्रकार आज तो शब्द विसरून हा आक्रमक तो आक्रमक म्हणतायत..,” असा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांवर केला आहे.
आज सकाळ पासून महाराष्ट्रा मध्ये कायदा सुव्यवस्था "फाट्यावर"मारून आंदोलन आणि गर्दी जमवली जात आहे. कुठेही सोशल डिस्टनसिंग नाही गर्दी च गर्दी अस असून "करोना हृदय सम्राट"गप्प का?आणि हो सोशल डिस्टनसिंग चा फज्जा म्हणणारे पत्रकार आज तो शब्द विसरून हा आक्रमक तो आक्रमक म्हणतायत
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 24, 2021
राणेंच्या वक्तव्यानंतर, आज मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी शिवसेना आणि शिवसेनेच्या संघटनांकडून आंदोलन केले गेले असून, अनेक ठिकाणी भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये भिडत झाली आहे. अनेक ठिकाणी पोलिसांनी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यानावर लाठीचार्ज केला असून, शिवसेनेकडून अनेक ठिकाणच्या भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे, राज्यभरात मोठया प्रमाणावर तणावपूर्ण वातावरण तयार झालं आहे.
भाजप कार्यालयावर कोणी चाल करून याल, तर खबरदार! फडणवीसांचा शिवसेनेला इशारा
दुसरीकडे कालच मुख्यमंत्र्यांनी, “आरोग्याला प्राधान्य देऊन, जनतेचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण-वार, उत्सव, यात्रा काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा,” असे सांगत याहीवर्षी दहीहंडीसोबत येणाऱ्या इतर सणांवर निर्बंध असतील असे संकेत दिले. या पार्श्वभूमीवर, आज हा सगळा घटनाक्रम घडल्याने, मनसेकडून आता सरकारला थेट असा तिरकस सवाल केला गेला आहे.
Read Also :
- लाच प्रकरणाचे सत्र सुरूच; पिंपरी पाठोपाठ पुणे महापालिकेतील अधिकारी अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
- पुण्यातल्या आर डेक्कन मॉलवर शिवसैनिकांची दगडफेक; भाजप कार्यलयात कोंबड्या सोडल्या
- राणेंच्या घराबाहेर भाजपा आणि युवासैनिकांमध्ये तुफान राडा; दगडफेक आणि पोलिसांचा लाठीचार्ज
- ‘त्या’ वक्तव्याच्या पाठीशी नाही, पण भाजप नारायण राणेंच्या पूर्णपणे पाठिशी- फडणवीस
- “नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरती करुन शॉक दिला पाहिजे”- गुलाबराव पाटील