मुंबई : भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटलेले असतानाच, आता मोठी बातमी समोर येत असून, स्थानिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक केली आहे. त्यांना आधी रत्नागिरीच्या सत्र न्यायालयासमोर हजर केले जाणार असून, हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना नाशिक पोलिसांकडे देण्यात येणार असल्याची शक्यता आहे
‘त्या’ वक्तव्याच्या पाठीशी नाही, पण भाजप नारायण राणेंच्या पूर्णपणे पाठिशी- फडणवीस
दरम्यान, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र तो फेटाळण्यात आला, त्यांनतर त्यांनी उच्च न्यायालयात सुनावणीसाठी अर्ज केला होता. तो देखील फेटाळण्यात आल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आधी सरकारी आणि त्यांच्या खासगी डॉक्टरकडून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यांनतर त्यांचा ताफा पोलिसांच्या प्रचंड बंदोबस्तात निघाला.
भाजप कार्यालयावर कोणी चाल करून याल, तर खबरदार! फडणवीसांचा शिवसेनेला इशारा
दुसरीकडे, त्यांच्या वक्तव्यावरून आज मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी शिवसेना आणि शिवसेनेच्या संघटनांकडून आंदोलन केले गेले असून, अनेक ठिकाणी भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये भिडत झाली आहे. अनेक ठिकाणी पोलिसांनी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यानावर लाठीचार्ज केला असून, शिवसेनेकडून अनेक ठिकाणच्या भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे, राज्यभरात मोठया प्रमाणावर तणावपूर्ण वातावरण तयार झालं आहे.
राणेंच्या घराबाहेर भाजपा आणि युवासैनिकांमध्ये तुफान राडा; दगडफेक आणि पोलिसांचा लाठीचार्ज
आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही, या वक्तव्यावर पक्षाकडून प्रतिक्रिया दिली असून, राज्य सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांवर टीका करताना त्यांनी पत्रकार परिषदेत, “राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याच्या पाठिशी भाजप नाही, पण नारायण राणेंच्या खंबीरपणे पाठिशी आहे. वासरु मारलं तर सरकारची गाय मारण्याची भूमिका अयोग्य आहे,” अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. आज सकाळपासून राणेंवर अटकेची टांगती तलवार होती, अकहर आज त्यांना अटक करण्यात आली आहे.
Read Also :
- पुण्यातल्या आर डेक्कन मॉलवर शिवसैनिकांची दगडफेक; भाजप कार्यलयात कोंबड्या सोडल्या
- राणेंच्या घराबाहेर भाजपा आणि युवासैनिकांमध्ये तुफान राडा; दगडफेक आणि पोलिसांचा लाठीचार्ज
- “नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरती करुन शॉक दिला पाहिजे”- गुलाबराव पाटील
- राणे “कोंबडी चोर” अन् ठाकरे “घर कोंबडा”; बॅनरबाजीवरून शिवसेना-भाजपात रंगला कलगीतुरा
- नाशिकमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे कार्यालय फोडले; शिवसेना- भाजप वाद चिघळला