पुणे : नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद आता राज्यभरात उमटू लागले आहेत. शिवसैनिक आता आक्रमक झाले असून त्यांनी अनेक ठिकाणी आंदोलनं तसंच निदर्शनं कऱण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातल्या आर डेक्कन मॉलवरही शिवसैनिकांनी दगडफेक केली असून त्यात या मॉलचं बरंच नुकसान झालं आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेचे विभागप्रमुख सुरज लोखंडे यांच्या नेतृत्वात जंगली महाराज रस्त्यावरील भाजप कार्यालयात त्यांनी कोंबड्या सोडल्या आहेत. हीच राणेंची लायकी आल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.
नारायण राणेंना अटक करुनच दाखवा; भाजप नेत्यांच सरकारला पुन्हा चॅलेंज
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आता शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. कुठे आंदोलनं सुरु आहेत तर कुठे दगडफेक. शिवसैनिकांचा संताप लक्षात घेऊन शहर पोलिसांनी भाजपच्या कार्यालयाला बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी आज गुडलक चौकात कोंबड्यांसह आंदोलन केले असून डेक्कन जिमखाना येथील आर डेक्कन मॉलवर काही शिवसैनिकांनी दगडफेक केल्याची घटना घडली.
अटक करायला मी काय सामान्य माणूस आहे का? आमचे पण वरती सरकार, बघतोच – नारायण राणे
राज्यभरात निषेध होत असून ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. या वक्तव्यामुळे पुण्यातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता तरी आम्ही पुण्यातल्या भाजप कार्यलयात घुसलो आहोत. वेळ आल्यास भारतीय जनता पार्टीचे ऑफिसही फोडून टाकू असा इशारा यावेळी विभागप्रमुख सुरज लोखंडे यांनी दिला आहे. ‘
Read Also :
- राणेंच्या घराबाहेर भाजपा आणि युवासैनिकांमध्ये तुफान राडा; दगडफेक आणि पोलिसांचा लाठीचार्ज
- “नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरती करुन शॉक दिला पाहिजे”- गुलाबराव पाटील
- राणे “कोंबडी चोर” अन् ठाकरे “घर कोंबडा”; बॅनरबाजीवरून शिवसेना-भाजपात रंगला कलगीतुरा
- खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर समोर या, तुमची औकात दाखवतो – निलेश राणे
- नारायण राणेंची केंद्रीय मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा; शिवसेना खासदाराचे मोंदींना पत्र