मुंबई : भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटलेले असतानाच, आता मोठी बातमी समोर येत असून, स्थानिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक केली आहे. त्यांना आधी रत्नागिरीच्या सत्र न्यायालयासमोर हजर केले जाणार असून, हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना नाशिक पोलिसांकडे देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
ब्रेकिंग! मुख्यत्र्यांवरचं वादग्रस्त वक्तव्य भोवलं, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक
मात्र, त्याआधीच राणे यांच्या प्रकृतीसंदर्भातली एक मोठी माहिती समोर येत असून, राणे यांची तब्येत खालावली आहे. त्यांना बीपी आणि शुगरचा त्रास जाणवत असून, त्यामुळे, त्यांना लवकरच रुग्णालयाच दाखल केले जाण्याची शक्यता आहे,” अशी माहिती भाजप नेते प्रमोद जठार यांनी दिली आहे. दरम्यान, त्यांच्यावरच्या या कारवाईचे सर्व राज्यस्तरीय भाजप नेत्यांनी तीव्र विरोध केला असून, राणे समर्थक आणि भाजप समर्थकांनी संतप्त होऊन संगमेश्वर पोलीस ठाण्याबाहेर त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.
भाजप कार्यालयावर कोणी चाल करून याल, तर खबरदार! फडणवीसांचा शिवसेनेला इशारा
नारायण राणे यांच्या शरीरातील साखरेचे आणि रक्तदाबाचे प्रमाण वाढले असून, त्यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करावे लागू शकते, तशी गरज आहे, अशी माहिती वैद्यकीय पथकातील डॉकटर यांनी, त्यांची प्राथमिक तपासणी केल्यानंतर माध्यमांसमोर येऊन दिली आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्यावर केलेल्या वक्तवव्यावरून शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली असून, नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
‘त्या’ वक्तव्याच्या पाठीशी नाही, पण भाजप नारायण राणेंच्या पूर्णपणे पाठिशी- फडणवीस
दुसरीकडे, त्यांच्या वक्तव्यावरून आज मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी शिवसेना आणि शिवसेनेच्या संघटनांकडून आंदोलन केले गेले असून, अनेक ठिकाणी भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये भिडत झाली आहे. अनेक ठिकाणी पोलिसांनी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यानावर लाठीचार्ज केला असून, शिवसेनेकडून अनेक ठिकाणच्या भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे, राज्यभरात मोठया प्रमाणावर तणावपूर्ण वातावरण तयार झालं आहे.
Read Also :
- कुठेही सोशल डिस्टनसिंग नाही सगळीकडे गर्दी, मग आता “करोना हृदय सम्राट”गप्प का?
- पुण्यातल्या आर डेक्कन मॉलवर शिवसैनिकांची दगडफेक; भाजप कार्यलयात कोंबड्या सोडल्या
- राणेंच्या घराबाहेर भाजपा आणि युवासैनिकांमध्ये तुफान राडा; दगडफेक आणि पोलिसांचा लाठीचार्ज
- राणे “कोंबडी चोर” अन् ठाकरे “घर कोंबडा”; बॅनरबाजीवरून शिवसेना-भाजपात रंगला कलगीतुरा
- अटक करायला मी काय सामान्य माणूस आहे का? आमचे पण वरती सरकार, बघतोच – नारायण राणे