मुंबई : भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटलेले असतानाच, आता मोठी बातमी समोर येत असून, स्थानिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक केली आहे. त्यांना आधी रत्नागिरीच्या सत्र न्यायालयासमोर हजर केले जाणार होते. मात्र आता त्यांचा ताबा महाड पोलिसांना देण्यात येणार असून, त्यांना उद्या रायगड न्यायालयात हजर केले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
राणेंना अटक! आता जन आशीर्वाद यात्रेचं काय? फडणवीसांनी सांगितला ‘प्लॅन’
या सर्व राड्यानंतर आता विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “जे काही सुरू आहे ते व्हायला नको होतं, चुकीच्या पद्धतीने सर्व काही होत आहे,” असं मत त्यांनी या सगळ्या घटना क्रमाच्या पार्श्वभूमीवर मांडलं आहे, अशी सूत्रांनी माहिती दिली असून, राज ठाकरे सध्या तरी या विषयावर अधिकृतपणे बोलणार नाहीत, अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ‘कृष्णकुंज’ वर मनसे अध्यक्षांची भेट घेतली, यांनतर त्यांची हि प्रतिक्रिया बाहेर आली.
मोठी बातमी! राणेंची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल केले जाण्याची शक्यता
दरम्यान, गोळवली इथे त्यांना स्थानबद्ध असताना, त्यांची डॉक्ट्रांकडून तपासणी केली गेली होती. नंतर त्यांना संगमेश्वर येथे पोलिसांनी नेले असता, प्रकृतीसंदर्भातली एक मोठी माहिती समोर आली. त्यानुसार त्यांना बीपी आणि शुगरचा त्रास जाणवत असून, त्यांना लवकरच रुग्णालयाच दाखल केले जाण्याची गरज आहे,” अशी माहिती वैद्यकीय पथकातील डॉक्टरनी केली आहे. दुसरीकडे, त्यांच्यावरच्या या कारवाईचे सर्व राज्यस्तरीय भाजप नेत्यांनी तीव्र विरोध केला आहे.
ब्रेकिंग! मुख्यत्र्यांवरचं वादग्रस्त वक्तव्य भोवलं, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक
नारायण राणे यांनी, महाडमध्ये ‘जन आशीवार्द’ यात्रेवेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, “मुख्यमंत्र्यांना देशाचा कितवा स्वातंत्र्य दिवस हे आठवत नाही, जर त्या ठिकाणी मी असतो तर कानाखाली खेचली असती,” असं आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर त्यांच्यावर नाशिक, महाड आणि अजून एका ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या वक्तव्यावरून आज मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी शिवसेना आणि शिवसेनेच्या संघटनांकडून आंदोलन केले गेले. त्यामुळे, राज्यभरात मोठया प्रमाणावर तणावपूर्ण वातावरण तयार झाले.
Read Also :
- राणेंना जेवण करताना पोलिसांची धक्काबुक्की’, हातातले ताटही ओढले; आमदार प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप
- कुठेही सोशल डिस्टनसिंग नाही सगळीकडे गर्दी, मग आता “करोना हृदय सम्राट”गप्प का?
- भाजप कार्यालयावर कोणी चाल करून याल, तर खबरदार! फडणवीसांचा शिवसेनेला इशारा
- ‘त्या’ वक्तव्याच्या पाठीशी नाही, पण भाजप नारायण राणेंच्या पूर्णपणे पाठिशी- फडणवीस
- राणेंच्या घराबाहेर भाजपा आणि युवासैनिकांमध्ये तुफान राडा; दगडफेक आणि पोलिसांचा लाठीचार्ज