अयोध्येत भव्य राम मंदिराची पायाभरणी केली जाणार आहे. त्यासाठी तयारीही पूर्ण झाली आहे. मात्र मुहूर्तावरुन सुरु झालेला वाद काही थांबताना दिसत नाही. अशातच आता भूमिपूजनाचा मुहूर्त सांगणाऱ्या पुजाऱ्यालाच जीवे मारण्याची धमकी आली आहे
एन. आर. विजयेंद्र शर्मा असं या बेळगावमधील पुजाऱ्याचं नाव आहे. ते म्हणाले, “देशभरातून मला राम मंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त बदलण्यासाठी धमकीचे फोन येत आहेत. मुहूर्त न बदलल्यास त्याचे परिणाम भोगण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे.”
विजयेंद्र शर्मा म्हणाले, “मला कॉल करणाऱ्यांनी विचारलं की तुम्ही भूमिपूजनासाठी या तारखा का दिल्या आणि का या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात आहेत? मी त्यांना सांगितलं की आयोजकांनी मला मुहूर्त सांगण्याची विनंती केली आणि मी गुरु या नात्याने माझं कर्तव्य पूर्ण केलं. मात्र, धमकी देणाऱ्यांनी आपलं नाव सांगितलं नाही.”