मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांच्या बद्दल ट्विटरवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भाजपचा पदाधिकारी जितेन गजारीया याला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ताब्यात घेतलं आहे. जितेन गजारीया याने रश्मी ठाकरे यांच्या सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दलही ट्विटरवर आक्षेपार्ह वक्तव्यं केलं होतं.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना कोरोनाची लागण
जितेन गजारिया हे भारतीय जनता पक्षाचे सोशल मीडिया प्रभारी आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात ट्विट करताना आक्षेपार्ह भाषेचा उपयोग केला होता. आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी जितेन गजारिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाबतही आक्षेपार्ह लिखान केलं होतं. त्यामुळे त्यांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने नोटीस बजावली होती.
Marathi Rabri Devi pic.twitter.com/P1rnO0SC9o
— Jiten Gajaria (@jitengajaria) January 4, 2022
त्यानंतर आता जितेन गजारिया यांना चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतलं आहे. हे आक्षेपार्ह ट्विट त्यांनी का केलं आणि त्यामागे त्यांचा काय उद्देश होता याबाबत आता पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया प्रभारींनी अशाप्रकारे आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षाला राज्यात सत्ता मिळत नसल्याने त्यांच्याकडून अशा प्रकारचे कृत्य सुरू असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून येत आहे.
Read also:
- विमानतळ जागेचा वाद पुन्हा पेटणार: भाजपा आमदार महेश लांडगे म्हणतात… विमानतळ खेडमध्येच पाहिजे!
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही – देवेंद्र फडणवीस
- मुंबई लोकल पुन्हा बंद? राज्यात विकेंट लॉकडाऊन लागणार? राजेश टोपेंचं मोठं विधानं
- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर अटकेची टांगती तलवार; परळी कोर्टाकडून अटक वॉरंट जारी
- काँग्रेस आमदार आपल्याच मंत्र्यांवर नाराज, पटोलेंना डावलून थेट दिल्लीत जाणार?