मुंबई : मोदींसोबत पंजाबमध्ये जे घडलं त्यावरुन महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. काँग्रेस नेत्यांची वक्तव्य हा निर्लज्जपणाचा कळस, कारण नरेंद्र मोदींच्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही, असही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पत्रकारांनी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
आम्ही गोट्या खेळत होतो का? पुण्यात भरकार्यक्रमातच शिवसेना -राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये हमरीतुमरी
पंजाब मधील आंदोलक हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. असा आरोप फडणवीसांनी केला. त्यांना पोलिसांनी परवानगी दिली होती, असाही दावा त्यांनी केलाय. त्यामुळे पंतप्रधानांचा ताफा 20 मिनिटे थांबून होता. माजी मुख्यमंत्री अमरीनंदर सिंग यांनी सांगितलं की, तिथून पाकिस्तानची सीमा 10 किलोमीटर अंतरावरच होती. आमची राष्ट्रपतींना विनंती आहे, याची दखल देशपातळीवर घेतली जावी. पंतप्रधानांवरील हल्ला हा देशावरील हल्ला असतो. काँग्रेस नेते ज्या बेशरमपणे पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत बोलत आहेत, ती निर्लज्जता आहे. जनतेचा आशीर्वाद घेऊन मोदी आले आहेत. या आशीर्वादामुळे मोदींच्या केसालाही धक्का लागणार नाही, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं.
बेनकेंसोबत झालेल्या राड्यावर सोनवणे स्पष्टच बोलले; महाविकास आघाडीत शिवसेनेला अपमानित केलं जातयं
पंतप्रधानांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना या देशातील जनता कधीच माफ करणार नाही, असं फडणवीस म्हणालेत. एवढी मोठी घटना घडूनही त्या राज्याचे मुख्यमंत्री फोन उचलत नाहीत, याची जेवढी निंदा केली जावी, तेवढी कमीच असेल, असंही ते म्हणालेत. काँग्रेसचं घे घाणेरडं राजकारण आता जनतेपासून लपून राहिलेलं नाही. काँग्रेसचे नेते जी वक्तव्य आता करत आहेत, ती म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. पंजाबमध्ये कॉंग्रेस जो खेल करू इच्छित आहे, तसाच खेळ 80 च्या दशकात कॉंग्रेसने केला होता. याचे गंभीर परिणाम काँग्रेसला भोगावे लागतील, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
Read also:
- मुंबई लोकल पुन्हा बंद? राज्यात विकेंट लॉकडाऊन लागणार? राजेश टोपेंचं मोठं विधानं
- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर अटकेची टांगती तलवार; परळी कोर्टाकडून अटक वॉरंट जारी
- काँग्रेस आमदार आपल्याच मंत्र्यांवर नाराज, पटोलेंना डावलून थेट दिल्लीत जाणार?
- परदेशातून आलेल्या नागरिकांची पुणे विमानतळावर होणार आरटीपीसीआर चाचणी.!*
- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना कोरोनाची लागण