पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघ शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील धुसमुस संपता संपेना झाली आहे. मागील काही दिवसांमध्ये बैलगाडा शर्यत प्रकरणावरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी नाराजी व्यक्त केली होती.
राज्यातील महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
शिवसैनिकांना फक्त जगू द्या अशी हतबलता त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे आणि विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्यात उघड संघर्ष झालेला दिसत आहे. यानंतर शरद सोनवणे यांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. शरद सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की मी जेव्हा आमदार होतो तेव्हा मी अनेक विकास कामे मंजूर करून घेतली होती. ही कामे २०१८ सालच्या शेवटी मंजूर करण्यात आली होती. २०१९ ला आचारसंहिता लागली आणि कामांना स्थगिती मिळाली. त्यानंतर कोरोनाच्या महारामारीमुळे निधीची अडचण झाली आणि कामे रेंगाळली.
मुंबई-पुण्यातील विद्यापीठांचे JNU करायचे आहे काय? आशिष शेलारांचा हल्लाबोल
कामे रद्द झाली नव्हती फक्त त्यांना सुरु होण्यास उशीर होत होता. जी कामे पूर्वीच्या आमदारांनी मंजूर केली आहेत. ती आता पूर्ण झाली आहेत. त्यांच्या उद्धघाटनाच्या कार्यक्रमांना माजी आमदारांना निमंत्रित केले पाहिजे. विद्यमान आमदारांनी माजी आमदारांना विश्वासात न घेता आम्ही जी कामे मंजूर करवून घेतली त्या कामाच्या उद्घाटनला फेटे लावून त्यांनी बॅनर लावले.
ही कामे आम्हीच केली, असे सांगत आहेत. स्थगिती म्हणजे कामे रद्द झालेली नाही, ही कामे थांबविली आहेत. ती रद्द झालेली नाहीत. त्या कामांच्या उद्धघाटना आम्हाला कोणतेही आमंत्रण देण्यात आले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला असं देखील सोनवणे यांनी स्पष्ट केलं आहे. महाविकास आघाडीमध्ये तीनही घटकपक्ष एकत्र असताना शिवसेनेला जाणून बुजून डावललं जातं आहे. शिवसेनेला म्हणावा तसा मान सन्मान मिळतं नाही. संघर्ष करणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे. पण याचा असा अर्थ नाही, राष्ट्रवादीनं वेळोवेळी आमचा अपमान करावा. आम्हाला संघर्ष करावा लागत आहे, ही आमच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे हा गोंधळ उडाला.
Read also:
- आम्ही गोट्या खेळत होतो का? पुण्यात भरकार्यक्रमातच शिवसेना -राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये हमरीतुमरी
- नवीन पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ खेड तालुक्यातच करा; आमदार महेश लांडगे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
- माझं सोडा सत्तार यांना कोणीचं गांभीर्याने घेतं नाही; सत्तारांची पाठ फिरताच दानवेंनी सोडला टीकेचा बाण
- चंद्रकांत पाटलांचे ‘युती’चे संकेत अन् महेश लांडगेंची शिवसेनेच्या कार्यक्रमाला हजेरी!
- नाना पटोले, नौटंकी करणे तुमचा स्वभाव, मोदीजींबद्दल तोंड सांभाळून बोला – चंद्रकांत पाटील