– नारायणगाव येथील कार्यक्रमाला लांडगेंची उपस्थितीने चर्चेला उधाण
पुणे : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपा- शिवसेना युतीचे संकेत दिले. तसे जाहीर व्यक्तव्य पिंपरी-चिंचवडमध्ये सकाळी केले. सायंकाळी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी थेट शिरुर लोकसभा मतदार संघातील नारायणगाव येथील शिवसेनेच्या जाहीर कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह शिरुरच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बुधवारी पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पाटील म्हणाले की, ‘‘आमचे हे दोन भावांतील भांडण असून पुन्हा सबंध निर्माण करावे लागतात,” असे ते म्हणाले, ”राजकारणात कॉँक्रीट असं काही नसतं. शेवटच्या क्षणी तेथे काहीही होऊ शकते’’ तसेच, शिवसेनेला खऱ्या हिंदुत्वाकडे यावेच लागेल, असे सांगत त्यांनी शिवसेनेबरोबरच्या पुन्हा युतीचे स्पष्ट संकेतही दिले.
नागरिकांना सात दिवसांचे विलिनिकरण सक्तीचे; आरोग्य मंत्री राजेश टोपेंची माहिती
दरम्यान, भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी शिरुर लोकसभा मतदार संघातील नारायणगाव- वारुळवाडी येथील राजा शिवछत्रपी महाद्वार लोकार्पण सोहळ्याला सायंकाळी हजेरी लावली. शिवसेनेचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
२ वर्षे माणसाच्या जीवनातील मोठा कालावधी, आता लॉकडाऊनसाठी नागरिक तयार नाहीत – चंद्रकांत पाटील
विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले, शिवसेना नेते प्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे-पाटील, माजी आमदार शरद सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी छत्रपी शिवाजी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापणाही करण्यात आली. मात्र, या भव्य कार्यक्रमात मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची अनुउपस्थिती दिसली.
मुख्यमंत्रीपदासाठी रश्मी ठाकरेंच्या नावाची चर्चा; खासदार संजय राऊत म्हणतात…
वास्तविक, शिरुर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी आणि शिवसेना ‘महाविकास आघाडी’मध्ये अगोदरच ‘बिघाडी’ आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यातील राजकीय दरी दिवसेंदिवस वाढत आहे. सेना-राष्ट्रवादीतील वाढता तणाव भाजपाच्या पथ्यावर पडत आहे. त्यातच शिवसेनेच्या कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे यांनी हजेरी लावल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
आढळराव पाटलांची नाराजी भाजपाच्या पथ्यावर…
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची राष्ट्रवादी आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावरील नाराजी भाजपाच्या पथ्यावर पडणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील भोसरी मतदार संघामध्ये आढळराव पाटील यांना मानणारा मतदार वर्ग मोठा आहे. कोल्हे यांच्यावरील वाढती नाराजी आणि आमदार लांडगे यांचा शिरुरमधील वाढता जनसंपर्क यामुळे महापालिका निवडणुकीसह आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला फायदा होईल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
Read also:
- नाना पटोले, नौटंकी करणे तुमचा स्वभाव, मोदीजींबद्दल तोंड सांभाळून बोला – चंद्रकांत पाटील
- काँग्रेसप्रणित पंजाब सरकारचा पिंपरी-चिंचवड भाजपाकडून निषेध; पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यातील सुरक्षेबाबत बेफिकीरी
- मुंबई-पुण्यातील विद्यापीठांचे JNU करायचे आहे काय? आशिष शेलारांचा हल्लाबोल
- राज्यातील महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
- मला अपेक्षा होती की आदित्य ठाकरेंना…; विद्यापीठ कायद्यावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक