पुणे : गेल्या चार ते पाच दिवसांत परदेशातून आलेल्या व पुणे विमानतळावर उतरून जिल्ह्याच्या विविध भागांत गेलेल्या नागरिकांचा शोध घेऊन संबंधितांची आरोग्य तपासणी करण्याचेही आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाचा नवा प्रकार ओमायक्रॉनच्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर विमानतळावर उतरणाऱ्या सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचेही आदेश देशमुख यांनी प्रशासनाला दिले आहेत.
पुण्याच्या शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद राहणार; अजित पवारांच्या बैठकीत निर्णय
राज्य सरकारने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी, तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्याचे आदेश देशमुख यांनी दिले आहेत. तसेच गेल्या चार ते पाच दिवसांत परदेशातून जिल्ह्यात आलेल्या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची देखील चाचणी करण्याचे आदेश पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत प्रशासनाला दिले आहेत.
नाना पटोले, नौटंकी करणे तुमचा स्वभाव, मोदीजींबद्दल तोंड सांभाळून बोला – चंद्रकांत पाटील
याबाबत देशमुख म्हणाले, “विमानतळावर आलेल्या प्रवाशांची माहिती मुख्यमंत्री आणि सचिवांना देण्यात आली असून महापालिकेचे आरोग्य विभाग तपासणी पथक विमानतळावर यापूर्वीपासून कार्यरत आहे. राज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार परदेशातून आलेल्या प्रवाशांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असल्या, तरी संबंधित प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.”
चंद्रकांत पाटलांचे ‘युती’चे संकेत अन् महेश लांडगेंची शिवसेनेच्या कार्यक्रमाला हजेरी!
ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावाची शक्यता गृहित धरून शहरासह जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. तसेच खबरदारी म्हणून तत्काळ अतिरिक्त मनुष्यबळाचे नियोजन करण्यात येणार आहे. शहरासह जिल्ह्यातील ज्या नागरिकांनी लशीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतला आहे, त्यांची स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेण्यास सुरवात केली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.
Read also:
- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना कोरोनाची लागण
- बेनकेंसोबत झालेल्या राड्यावर सोनवणे स्पष्टच बोलले; महाविकास आघाडीत शिवसेनेला अपमानित केलं जातयं
- आम्ही गोट्या खेळत होतो का? पुण्यात भरकार्यक्रमातच शिवसेना -राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये हमरीतुमरी
- नवीन पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ खेड तालुक्यातच करा; आमदार महेश लांडगे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
- माझं सोडा सत्तार यांना कोणीचं गांभीर्याने घेतं नाही; सत्तारांची पाठ फिरताच दानवेंनी सोडला टीकेचा बाण