पुणे : वाढत्या ओमिक्रॉनच्या रूग्णसंख्येमुळे पुणे शहरातील पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आढावा बैठक पार पडली. यामध्ये पहिली ते नववी पर्यंतचे वर्ग पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही याबाबतचा निर्णय उद्या दुपारी 4 वाजता घेतला जाणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
…तेव्हा शरद पवार म्हणाले होते, मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारला काय? – चंद्रकांत पाटील
कोरोनाचा कहर आता पुन्हा एकदा वाढतो आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका वाढला असून त्या पार्श्वभूमीवर मुंबईसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख आयएस चहल यांनी सांगितलंय की, कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील इयत्ता 1 ते 9 पर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद राहतील. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इ.10 वी व 12 वी चे वर्ग वगळता अन्य वर्ग असणा-या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा प्रत्यक्ष अध्यापनासाळी बंद ठेऊन ऑनलाईन पध्दतीने सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
…तर केंद्राच्या नियमांनुसार लॉकडाऊन लागणार; महापौर किशोरी पेडणेकरांचा इशारा
याबाबत एक पत्र जाहीर करण्यात आलंय. त्या पत्रात म्हटलंय की, सद्यस्थितीत जगातील काही देशामध्ये व बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ओमीकोन या कोरोनाच्या नव्या प्रजातीचा प्रसार वाढत असल्याने मुंबईची एकूण लोकसंख्या तसेच या शहरात जगभरातून लोकांचे येणे जाणे सुरू असल्याने या नव्या प्रजातीचा प्रसार होऊ नये म्हणून कोरोनाचा (ओमिक्रॉन) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इ.10 वी व 12 वी चे वर्ग वगळता अन्य वर्ग (इ. 1 ली ते इ.9 वी व 11 वी ) असणा-या सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळा दि. 04 जानेवारी 2022 ने दि. 31.01.2022 पर्यंत प्रत्यक्ष बंद ठेवण्यात येत आहेत.
Read also:
- सॉरी, सॉरी, सॉरी, सॉरी…; जितेंद्र आव्हाडांनी भाजप नेत्याची मागितली जाहीर माफी
- बारा तासांच्या तुरुंगवासानंतर राष्ट्रवादीच्या आमदाराची सुटका; राजू कारेमोरे म्हणतात…
- पुणे जिल्हा बँकेत प्रदीप कंदांच्या रूपाने भाजपची ऐतिहासिक विजयी सलामी
- रश्मी ठाकरे मुख्यमंत्रिपद चांगलं सांभाळू शकतील; शिवसेना मंत्र्यांच महत्वपुर्ण विधान
- झुंड़ मे तो सुअर आते है; पोस्टरबाजी करत राणे समर्थकांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं