मुंबई : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्याचप्रमाणे खासदार हेमंत गोडसे यांनाही कोरोना झाला आहे. मागच्या आठवड्यात अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोना झाला आहे. सरकारमधले मंत्री, विरोधी पक्षातले नेते असे सगळेच कोरोनाने ग्रासले आहेत. त्यात आता भारती पवार यांच्या नावाचीही भर पडली आहे. भारती पवार यांनी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात ठिकठिकाणी दौरे केले होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका देखील घेतल्या होत्या. भारती पवार यांनी ट्विटरवरून आपल्याला कोरोना झाला असल्याची माहिती दिली आहे.
नाना पटोले, नौटंकी करणे तुमचा स्वभाव, मोदीजींबद्दल तोंड सांभाळून बोला – चंद्रकांत पाटील
आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वतः घरीच क्वारंटाईन झाले आहे. ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या होत्या त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन मी करते आहे. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करावं आणि मास्क लावावा असं आवाहन भारती पवार यांनी केलं आहे.
आज मेरी #Covid_19 टेस्ट का रिपोर्ट POSITIVE आया है और मैने अपने आप को घर में क्वॉरंटाइन कर लिया है.
मेरे संपर्क में आये व्यक्तियों से निवेदन है कि वो अपना #Covid-19 टेस्ट करवाएं और कोरोना के बचाव के नियमों का पालन करें.— Dr.Bharati Pravin Pawar (@DrBharatippawar) January 6, 2022
शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनाही कोरोना झाला आहे. त्यांनीही यासंदर्भातली माहिती ट्विट करून दिली असून सगळ्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
Read also:
- बेनकेंसोबत झालेल्या राड्यावर सोनवणे स्पष्टच बोलले; महाविकास आघाडीत शिवसेनेला अपमानित केलं जातयं
- आम्ही गोट्या खेळत होतो का? पुण्यात भरकार्यक्रमातच शिवसेना -राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये हमरीतुमरी
- नवीन पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ खेड तालुक्यातच करा; आमदार महेश लांडगे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
- माझं सोडा सत्तार यांना कोणीचं गांभीर्याने घेतं नाही; सत्तारांची पाठ फिरताच दानवेंनी सोडला टीकेचा बाण
- चंद्रकांत पाटलांचे ‘युती’चे संकेत अन् महेश लांडगेंची शिवसेनेच्या कार्यक्रमाला हजेरी!