पुण्यात कोरोनाचा थरार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुण्यातील या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आले होते. पुण्यातील विधानभवन सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांच्या आजच्या पुणे दौ-यावरून भाजपने उद्धव ठाकरे व पवारांवर लक्ष्य साधले आहे. मुख्यमंत्री घरी बसले तर जनक्षोभ निर्माण होईल, हे शरद पवारांना माहिती होतं. म्हणूनच कॅप्टननं घरी राहून काम करावं, असा सल्ला पवारांनी उद्धव ठाकरेंना दिला होता, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
तसेच, अजित पवारांच्या कामावर लक्ष द्यायलाच उद्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असल्याची टीकाही दरेकर यांनी केली आहे.
.