मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांच्याकडे ती नैतिकता नाही. निवडणुकीआधी भाजपसोबत युती केली होती. मोदींच्या नावावर 56 खासदार निवडून आणले. युती नसती तर 25 खासदार सुद्धा निवडून आले नसते. ठाकरेंनी बेईमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवले आहे. यांनी 56 आमदारांसाठी बेईमानी केली, अशा शब्दात भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टिका केली आहे.
मोदींच्या नावावर ५६ आमदार निवडून आणले हिम्मत असेल तर स्वतः च्या नावावर निवडून दाखव, पुढच्या निवडणुकीत शिवसेनेचे फक्त १० ते १५ आमदार निवडून येतील असा हल्ला भाजप खासदार व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कलम ३७० बद्दल बोलतात पण त्यांना कायदा तरी कळतो का? मोदींच्या नाववर 56 आमदार निवडून आले. ते नसते तर 25 ही निवडून आले नसते. यांनी बेईमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं. यांनी 56 आमदारांसाठी बेईमानी केली, अशा शब्दात भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे.
माझ्या आयुष्यात आतापर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले. त्यांनी आपल्या भाषणाने, शैलीने, विचाराने आणि कामाने आपली आणि महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवली. मात्र त्याला आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अपवाद आहेत. त्यांच्या कालच्या भाषणात कसलाही ताळमेळ नव्हता, शिवराळ भाषेत ते बोलले. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रीपदाचा भान राखला. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद भूषवण्याच्या लायकीचे नाहीत, असा हल्लाबोल भाजप खासदार नारायण राणे यांनी केला. कालच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
दरम्यान निलेश राणेंनी सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांना ट्विटर करत सांगितले आहे की, ‘नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल १ वाक्य पण बिहारवर २० मिनिट. उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा… तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो.’ अशी टीका निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
Read Also :
शिवसेनेचा दसरा मेळावा आरोपी आदित्य ठाकरेला क्लीन चिट देण्यासाठी होता: नारायण राणे https://t.co/FMPeTqoERC @MeNarayanRane @CMOMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 26, 2020