मुंबई : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना गद्दार असा उल्लेख करताना दिसतात. उद्धव ठाकरे यांच्या या टिकेला भाजप नेते नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिंदे गटातील आमदारांनी नाही तर शिवसेनेशी गद्दारी उद्धव ठाकरे यांनी केली, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
“संपूर्ण पवार कुटुंबाच्या रेशनकार्डावरील व्यक्तींची चौकशी झाली पाहिजे”; भाजपची मागणी
भाजप आणि जनतेशी गद्दारी उद्धव ठाकरे यांनी केेली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद गद्दारी करून मिळवलं. भाजप सोबतच कडवट शिवसैनिक एकनाथ शिंदे सारख्या नेत्यांशी गद्दारी केली. आमदारांना कोणतीही मदत केली नाही. जी काय कामे केली ती फक्त आपले नातेवाईक आणि मातोश्रीसाठी केली. त्यामुळे खरे गद्दार उद्धव ठाकरे आहेत, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.
ठाकरे सरकारने मुंबई मेट्रोचं काम बंद केलं. शिवसेना विकास फक्त पैसे मिळवण्यासाठी करते ही त्यांची व्याख्या होती. मात्र मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. यासाठी काही तरी करावं यासाठी शिंदे-फडणवीस सरकार प्रयत्न करत आहे, असही नारायण राणे म्हणाले. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई मेट्रो पकल्प 3 ला हिरवा सिग्नल दिला आहे. व 2023 पर्यंत सर्व काम पुर्ण होणार असल्याचं ही त्यांनी सांगितलं आहे.
“मी विकेट घेत नाही मी बॅटींग करणारा नेता आहे, चौकार षटकार कसा मारायचा मला चांगलं माहित आहे”
सोबतच, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपुर्वी केली. या युतीवरून भाजपच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. यावरून, उद्धव ठाकरेंची अशी अवस्था झाली आहे की ते सैराट मित्रमंडळ सोबत सुद्धा युती करतील, असा टोला शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवरून भाजपनेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
Read also
- “कमी बॉल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात ‘ईडी सरकार’ लवकरच ‘रनआऊट’ होईल”
- भाजपचं लक्ष्य आता बारामती, भाजप प्रदेशाध्यक्ष 5 सप्टेंबर रोजी दौऱ्यावर येणार
- “टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांचीही चौकशी व्हावी”; शिवसेनेची मागणी
- “शिवतीर्थवर होणारा ‘दसरा मेळावा’ म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे”
- “भाजपसोबत युती म्हणजे दो दिनकी चांदी फिर अंधेरी रात”