मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत बारामती अॅग्रो कंपनीचा आपण अभ्यास करत असून लवकरच सविस्तर अहवाल सादर करू, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना दिला आहे. या पार्श्वभूमीवर पवार हे संविधानापेक्षा मोठे नसून आयकर विभाग, ईडी अशा तपास संस्थांनीही सखोल चौकशी करणे गरजेचे आहे, असा घाणाघात भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केला आहे.
“राष्ट्रवादीकडे अनेक जण आकर्षित, काही राज्यात भाजपची सत्ता गेलीय, त्यामुळे जोमाने काम करा”
संपूर्ण पवार कुटुंबाच्या रेशनकार्डावरील व्यक्तींची चौकशी झाली पाहिजे. यावर जेवढी नावे त्यांची सखोल चौकशी करावी. सखोल चौकशीनंतरच पवार कुटुंबाचा खरा चेहरा जनतेसमोर येईल. पवार हे संविधानापेक्षा मोठे नसून आयकर विभाग, ईडी अशा तपास संस्थांनीही सखोल चौकशी करणे गरजेचे आहे, अशी घाणाघाती टीका भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी केली आहे.
“पुन्हा मंत्रिपदापासून पानटपरीवर चुना लावायला बसावे लागेल”; गुलाबराव पाटलांना राष्ट्रवादीचा टोला
ज्यांना लोकांत कोणतीही किंमत नाही, जनधार नाही, अशा लोकांसोबत ते युती करत आहेत. शिवसेना किती खोलात गेली आहे. हे यावरूनच समोर आले आहे. पण अशा कोणत्याही टेकूनं आता शिवसेना वरती येणार नाही, असा टोला शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवरून टोला लगावला आहे.
“काही लोकांना कमी काळात आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याचा भास झाला”
उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारधारेपासून खूप मोठी फारकत घेतली. आता त्यांना पुन्हा ट्रॅकवर येणे खूप अवघड आहे. ज्या लोकांनी हिंदुत्वाला विरोध केला. ज्या लोकांनी समाजात जातीयवाद पसरविण्याचा प्रयत्न केला. अशा लेकांसोबत जाऊन उद्धव ठाकरे समाजाला काय मेसेज देणार? असा सवाल पडळकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला आहे.
Read also
- “देशात मोदी लाट ओसरली”
- “मी विकेट घेत नाही मी बॅटींग करणारा नेता आहे, चौकार षटकार कसा मारायचा मला चांगलं माहित आहे”
- “बाळासाहेबांना म्हातारं, अन् उद्धव ठाकरे म्हणजे शिमग्यातला गोमू म्हटलं, त्याला नेतेपद”
- “पंकजा मुंडेंबद्दल बाेलावे एवढी अमोल मिटकरींची उंची तरी आहे काय?”; भाजपचा मिटकरींना सवाल
- “राहुल गांधींकडे कोणतंही राजकीय कौशल्य नाही”; गुलाब नबी आझाद