अहमदनगर : भाजपा आयोजित एका कार्यक्रमात भाजपचे खासदार सुजय विखे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घाणाघात केला आहे. सहा वेळा राज्याच्या मंत्रिमंडळात शपथ घऊन सहावेळा मुख्यमंत्र्याबरोबर काम करणारा आमदार राधाकृष्ण विखे पाटील. अडीच वर्षांमध्ये चेहरे जुनेच आहेत. पण सत्तांतर झाल्यानंतर आता असे चेहरे समोर येत आहेत, असं भाजप खासदार सुजय विखे पाटील म्हणाले.
“रोहिणी खडसे आल्या आता पंकजा मुंडेंनीही पाऊल उचलावे”; राष्ट्रवादीची पंकजा मुंडेंना ऑफर
काळ सारखा नसतो. काळ येतो जातो. लोकं मंत्री होतात जातात. पण काही लोकांना कमी काळात आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याचा भास झाला आहे. आपण त्याला काही करू शकत नाही, अशी टीका सुजय विखे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यावर केली आहे.
“कुठून येत असेल, इतकी उर्जा ह्या 82 वर्षाच्या तरूणाकडे”? पाक-भारत मॅच दरम्यान शरद पवारांचा जल्लोष
सुजय विखे कुणाला घाबरतो, सुजय विखेवर दडपण आले आहे, असे अजिबात नाही. राधाकृष्ण विखे जोपर्यंत महसूल मंत्री आहेत. एका महिन्यात पारनेर तालुक्यातून एकही अनधिकृत वाळूचे डंपर जाणार नाही. तसेच तहसीलदारांमार्फत धाडी टाकून गरिबांकडून पैसे वसूल करणे हे पारणेरमध्ये आजपासून बंद होणार, असा इशारा सुजय विखे यांनी दिला.
“झंडू बाम घेऊन ठेवा”; संभाजी ब्रिगेडचा भाजपवर हल्लाबोल
सोबतच, पारनेरमध्ये केकचा खप जास्त आहे. महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये एवढा मोठा केकचा खप पारनेर तालुक्यात आहे. याचा सर्वे करायला पाहिजे आणि जो कोणी व्यक्ती याचा कारणीभुत आहे त्याचा या केकच्या कंपनीकडून जाहीर सत्कार करायला पाहिजे, असा टोलाही सुजप विखे यांनी लगावला आहे.
Read also
- “जन्मदात्या आईची, बायकोची अन् बहिणीची आठवण असू द्या”; राष्ट्रवादीकडून गुलाबराव पाटलांना समज
- “गुवाहाटीची तिकीट जाधवांना पण हवी होतं, पण त्यांना ते मिळालं नाही”
- “विहिरीत जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही”; नितीन गडकरी
- चंद्रकांत खैरे अन् शिरसाट यांच्यात मान सन्मानावरून वाद; इम्तियाज जलील यांची मध्यस्ती
- “तारिख पे तारिख, हे प्रकरण 4 ते 5 वर्ष चालेल, मग आम्हीच निवडणुका जिंकू”; शिंदे गटाचा दावा