जळगाव : गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या पुण्याईने भाजप पक्ष वाढला. मात्र सुडाचं राजकारण करून त्यांच्याच मुलीचा पराभव करण्यात आला. रोहिणी खडसेंना हे लक्षात आलं. मात्र पंकजा मुंडे यांच्याही लक्षात यायला पाहिजे. राज्यपाल 12 आमदारांची यादी जाहीर करतील त्या यादीत ही पंकजा मुंडे यांचं नाव नाही. एक प्रकारे रोहिणी खडसे या राष्ट्रवादीत आल्या. तशाच पंकजा मुंडेंनीही पाऊले उचलावं, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
पुन्हा मोदीच! जागतिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी अव्वलस्थानी
आताचे ग्रामविकास मंत्री आणि मागील जलसंपदा मंत्री ते म्हणत होते, दारूच्या बाटलीला बाईचे नाव द्या. आठवते का? काय म्हणत होते? अशी टीका मिटकरी यांना गिरीश महाजन यांच्यावर केली आहे. आता कोण मंत्री आहे. कुठल्या खात्याचा मंत्री आहे, आम्हालाही कळत नाही. मंत्रिमंडळाला विस्तार रखडलेला आहे. अपक्ष नाराज आहेत. लोकांनी त्यांना मंत्रिपद दिलं. त्यांच्याबद्दल जनतेच्या मनात रोष आहे, असही मिटकरी म्हणाले.
शिंदे गट शिवसेनेचा दसरा मेळावा हायजॅक करणार?; भाजपकडून हलचाली सुरू
संदिपन भुमरे कॅबिनेट मंत्री आहेत. भुमरे पैठणला गेले होते. त्यांच्या सभेला फक्त 115 लोक होते. आमची राष्ट्रवादीची सभा दाखवा. किती लोक आहेत हे कळू द्या. सत्तेच्या जोरावर तुम्ही सभेला जनता आणू शकत नाही. तुम्ही फक्त 50 खोके घेऊन ओके होऊ शकता, असा टोला अमोल मिटकरी यांनी मंत्री संदिपान भुमरे यांना लगावला आहे.
“सत्तेविना मती गेली, जो मिळाला त्याच्याशी युती केली”; मनसेचा उद्धव ठाकरेेंना टोला
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधी विषयी मिटकरी म्हणाले की, अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी झाला नसता तर भाजपची महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठली नसते. संताजी, धनाजीने औरंगजेबच्या तंंबुचे कळस काटले होते. मात्र अजितदादांनी भाजपचे कळस कधी काटले हे भाजपला कळलच नाही.
Read also
- “कुठून येत असेल, इतकी उर्जा ह्या 82 वर्षाच्या तरूणाकडे”? पाक-भारत मॅच दरम्यान शरद पवारांचा जल्लोष
- “झंडू बाम घेऊन ठेवा”; संभाजी ब्रिगेडचा भाजपवर हल्लाबोल
- “हेच अडाणी लोक महाराष्ट्राचे वाटोळे करणार”; रूपाली ठोंबरे-पाटील
- “केवळ पादुका ठेवून कोणी नेतृत्व करू नये”; पृथ्वीराज चव्हाणांचा पक्षाला घरचा आहेर
- “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रडीचा डाव सुरू!”; किशोरी पेडणेकर