मुंबई : शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. या युतीचा शिवसेनेला चांगलाच फायदा होणार असल्याचही उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवरून मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. मनसे नेते गजानन काळे यांच्या नंतर आता मनसे आमदार राजू पाटील यांनीही शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवरून उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
“शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र लढणार”; उद्धव ठाकरेंची मोेठी घोषणा
सत्तेविना मती गेली, जो मिळाला त्याच्याशी युती केली.., असा टोला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. मनसे नेते राजू पाटील यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फुट पडली ही फुट भरण्यासाठी ही युती केली असल्याचं बोललं जात आहे. या युतीचा शिवसेनेला येणाऱ्या निवडणुकांत चागलाच फायदाही होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
“मला घरी जायचं आहे..माझे प्रश्न लवकर घ्या”; केसरकरांच्या विनंतीने सभागह आवाक
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवरून, आता तेवढं MIM बरोबर युती करून हिंदुत्वाला कायमची तिलांजली देवून टाका… आणि स्वतःला नवाब सेना पक्षप्रमुख हे ब्रीद वाक्य कायमचं लावून घ्या..असं ट्विट मनसेचे नेते गजानन काळे यांनी करत शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर लगावला. यासोबतच, राष्ट्रवादीची ‘बी’ टीम ब्रिगेड बरोबर राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम नवाब सेनेची युती.. नवाब प्रमुखांच ब्रिगेडी (बेगडी) हिंदुत्व.. बढिया हैं..असंही मनसे नेते गजानन काळे यांनी म्हणत शिवसेनेसोबत राष्ट्रवादीलाही टोला लगावला आहे.
गुलाम नबी काँग्रेसमधून ‘आझाद’; सदस्यत्वासह सगळ्या पदांचा राजीनामा
सोबतच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांनी युतीचा फुसका बार सोडला आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीचा शिवसेनेला काहीच फायदा होणार नाही, असा टोला देखील उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
सत्तेविना मती गेली,
जो मिळेल त्याच्याशी युती केली…!#Maharashtra— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) August 26, 2022
Read also
- “उद्धव ठाकरे यांच्यात दम नाही”; नवनीत राणांचा ठाकरेंना टोला
- “काही लोक सभागृहात काहीच बोलत नाहीत मात्र सभागृहाच्या पायऱ्यांवर जोर जोरात बोंबलतात”
- “राष्ट्रवादीची ‘बी’ टीम ब्रिगेड बरोबर राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम नवाब सेनेची युती”; मनसेचा शिवसेनेला टोला
- “नितेश राणे रात्री पत्र लिहतात काय?”; किशोरी पेडणेकरांचा राणेंना टोला
- “फुसक्या बारला युवराज वगैरे म्हणू नका”